Monday, January 13, 2025
Home मराठी ‘ही विकृती थांबणार नाही…’ सोशल मीडियावरील ट्रोलर्सला ऐश्वर्या नारकर यांनी दिले सडेतोड उत्तर

‘ही विकृती थांबणार नाही…’ सोशल मीडियावरील ट्रोलर्सला ऐश्वर्या नारकर यांनी दिले सडेतोड उत्तर

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Rai) या मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय आहेत. सोशल मीडियावर त्या मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. ऐश्वर्या नारकर या त्यांच्या पतीसोबत अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचे हटके व्हिडिओज आणि फोटो काही लोकांना आवडतात. तर काही लोक त्यांच्या या पोस्टला ट्रोल देखील करतात. नुकतेच त्यांनी एका माध्यमाला मुलाखतीत दिली आहे. यात त्यांनी सोशल मीडियावर नेहमीच ट्रोल करणाऱ्यांना लोकांना सडेतोड उत्तर दिलेले आहे.

ऐश्वर्या नारकर याबद्दल म्हणाल्या की, “एखादी गोष्ट आवडली तरी तुम्ही ती आवडली नाही, म्हणून सांगू शकता. पण त्याच्यावर तुमचा अधिकार नाही. त्यांचं आयुष्य हे त्याच आयुष्य आहे. त्याच्या पेजवरून किंवा तिच्या पेजवरून तिने काय दाखवायचं काय करायचं हे तिचं ती ठरवणार आहे. तुम्ही बघून त्याच्यावर उगाचच वाटेल त्या चर्चा करून मतप्रदर्शन करून समोरच्याच मानसिक आरोग्य वाया घालवण्याचा तुम्हाला काही अधिकार नाहीये. ते खूप चुकीचं आहे.”

यापुढे ऐश्वर्या नारकर म्हणाल्या की, “सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे याबाबत ॲक्शन घेणारा आपल्याकडे कोणताही कायदा नाही. तसेच आपल्याकडील पोलीस डिपार्टमेंट यावर काहीही करू शकत नाही. तसेच सोशल मीडियाचे देखील असे काही कायदे नाहीत. फक्त तुम्ही त्यांना ब्लॉक करू शकता. तुम्ही ब्लॉक केलं म्हणून तो माणूस बोलायला कमी करणार नाही. सोशल मीडियावर असे पेजेस देखील आहेत. त्याबद्दल चांगल्या लोकांकडून आम्हाला डीएम येतात की, आपण तुमचा फोटो अशा पद्धतीने इथे इथे वापरला गेला आहे. त्याच्यावर फार वाईट कमेंट केल्या गेल्या आहेत. त्याच्यावर आपण काही करू शकत नाही. रिपोर्ट केल्याने त्या अकाउंट बंद होईल म्हणून विकृती थांबणार नाही.”

ऐश्वर्या नारकर नेहमीच त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. परंतु अनेक लोक त्यावर वाईट कमेंट देखील करतात. ऐश्वर्या नारकर यांनी या सुखांनो या, स्वामिनी, लेक माझी लाडकी, सातव्या मुलीची सातवी मुलगी यांसारख्या लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये काम केलेले आहे. त्यांनी अनेक मराठी सिनेमे आणि हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलेले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

अशी ही मदनमंजिरी! अमृता खानविलकरचा सोज्वळ लुक सोशल मीडियावर व्हायरल
10 वर्षांनी पदवी घेण्यासाठी कार्तिक आर्यन पोहचला कॉलेजमध्य, मुलांसोबत केला डान्स

हे देखील वाचा