कलाकार हे त्यांच्या चित्रपटांमुळे जितके लोकप्रिय होतात, तितकेच लोकप्रिय ते त्यांच्या फोटोशूटसाठी असतात. सेलिब्रिटी रोज नवनवे फोटोशूट करतात आणि त्यातले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतात. फोटोशूटच्या निमित्ताने कलाकरांना वेगवेगळ्या अवतारात बघणे ही फॅन्ससाठी एक पर्वणीच असते. सर्वच कलाकार त्यांचे फोटोशूट करून घेत असतात. बॉलिवूडमधील लोकप्रिय फोटोग्राफर असणाऱ्या डब्बू रत्नानीकडून फोटोशूट करून घेणे हे सर्वच कलाकारांचे स्वप्न असते. डब्बू रत्नानीकडून अनेक मोठमोठ्या अभिनेत्री, अभिनेते त्यांचे फोटोशूट करून घेत असतात.
विश्वसुंदरी असणाऱ्या ऐश्वर्या रायने देखील तिचे डब्बू रत्नानीकडून फोटोशूट करून घेतले आहे. या फोटोशूटमधील एक फोटो डब्बू रत्नानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. डब्बू रत्नानीने २०२१ वर्षाच्या कॅलेंडरसाठी ऐश्वर्याचा काढलेला हा फोटो सध्या तुफान गाजत आहे. या फोटोमध्ये ऐश्वर्याचे सौंदर्य अधिकच उठून येत आहे. (aishwarya rai bachchan is looking gorgeous in dabboo ratnani calender photoshoot)
या मोनोक्रोम शूटमध्ये ऐश्वर्या खूप सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये ऐश्वर्याने टॉपसोबत जॅकेट घातले आहे. तिच्या या लूकवर तिची हाय व्हॉलूम बीच वेवी हेयरस्टाइल लुकला अधिकच खुलवत आहे. यात तिची करारी नजर देखील लक्षवेधी ठरत आहे. तिचा हा फोटो पाहणारी प्रत्येक व्यक्ती ऐश्वर्याच्या नक्कीच प्रेमात पडेल.
ऐश्वर्याचा हा फोटो शेअर करताना डब्बूने लिहिले, “जेव्हा तुमच्या आत प्रकाश असतो, तेव्हा तुम्ही बाहेरही चमकतात.” ऐश्वर्याच्या सौंदर्यला आणि तिच्या व्यक्तिमत्वाला हे कॅप्शन खूपच सूट होत आहे. ऐश्वर्याच्या या फोटोवर फॅन्स तर फॅन्स कलाकारही कमेंट्स करताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्याचे काही काळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून तिचे वजन वाढलेले दिसले आणि तिचे पोट देखील जरा मोठे दिसले. त्यावरून चाहत्यांमध्ये ऐश्वर्या दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
ऐश्वर्याच्या कांमाबद्दल सांगायचे झाले तर ती लवकरच मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियन सेलवन’ सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा तामिळ उपन्यासावर आधारित असणार असून, दोन भागात प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमात ऐश्वर्या नंदिनी नावाची भूमिका साकारणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिनेता ते साधूपर्यंत किस करण्यामुळे वादात राहिलीय शिल्पा शेट्टी; कोर्टाने जारी केला होता वॉरंट
-गौरीला ‘शक्ती : द पॉवर’मध्ये नव्हती आवडली शाहरुखची ओव्हर ऍक्टिंग; म्हणाली ‘सगळ्यात’ वाईट चित्रपट