×

‘डोला रे डोला’ गाण्याच्या शुटिंगवेळी ऐश्वर्या रायच्या कानातून वाहू लागले रक्त, तरीही पूर्ण केली शूटिंग

आपल्याला नेहमीच बॉलिवूड म्हटले की त्यात असलेली चमक धमक दिसते. कलाकारांचे आलिशान जीवन दिसते. मात्र हे सर्व मिळवण्यासाठी कलाकार किती संघर्ष करतात, त्यामागे त्यांचे किती समर्पण असते, किती मेहनत, त्याग असतो हे कोणालाच दिसत नाही दिसतो तो फक्त त्यांनी कमावलेला पैसा आणि चैनेची जीवन. जेव्हा कलाकार त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग करत असतात तेव्हा त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कधी कधी कलाकारांना सेटवर जखमा देखील होतात मात्र ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत ते सर्व त्रास बाजूला ठेवत काम करतात. बॉलिवूडच्या बाबतीत असे अनेक किस्से गाजलेले आहेत. असाच एक किस्सा ऐश्वर्या रायच्या बाबतीत घडला आहे.

आज ऐश्वर्या राय बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री आहे. मिस वर्ल्ड असणाऱ्या ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचे एक वेगळे आणि मोठे स्थान निर्माण केले. ऐश्वर्याने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट सिनेमे बॉलीवूडला दिले. तिचा असाच एक हिट सिनेमा म्हणजे ‘देवदास’. २००२ साली आलेल्या या सिनेमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले. या सिनेमात ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित आणि शाहरुख खान मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाने मोठ्या प्रमाणावर कमाई केली सोबतच प्रेक्षकांचे भरपूर प्रेम देखील मिळवले. या सिनेमातील हिट गाणे असलेल्या ‘डोला रे डोला’ या गाण्याच्या शुटिंगवेलचा एक किस्सा तुफान गाजला.

‘डोला रे डोला’ या गाण्याचा सेट, डान्स, अभिनेत्रीचा ड्रेस, गाण्याचे म्युझिक आदी सर्वच गोष्टींमुळे हे गाणे तुफान गाजले. या गाण्यात माधुरी आणि ऐश्वर्या यांच्या ड्रेस आणि दागिन्यांवर खूपच लक्ष दिले होते. हेव्ही बंगाली साडीसोबतच भारीभक्कम दागिने घालून ऐश्वर्या आणि माधुरीने या गाण्यात डान्स केला होता. मात्र शुटिंगवेळी ऐश्वर्या रायच्या कानातून रक्त येऊ लागले. कानात मोठे आणि जड कानातले घातल्यामुळे तिचे कान लटकू लागले आणि त्यातून रक्त वाहू लागले. मात्र तिने शूटिंग चालू असल्यामुळे कोणालाच ही बाब सांगितली नाही आणि तशीच शूटिंग केली, शूटिंग झाल्यानंतर ऐश्वर्याने सर्वांना ही बाब सांगितली आणि तिच्यावर उपचार झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post