जेव्हा भारताबद्दल परदेशी होस्टने ऐश्वर्याला विचारला ‘हा’ प्रश्न; अभिनेत्रीनेही दिले होते सडेतोड प्रत्युत्तर


आपल्या अभिनयासोबतच सौंदर्याने सर्वांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय बच्चनला ओळखले जाते. ऐश्वर्याने १९९४ मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. ऐश्वर्याचे नाव त्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवली आहे. याचबरोबर ऐश्वर्याची पोस्ट सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असते, जी तिच्या चाहत्यांनाही पाहायला खूप आवडते. ऐश्वर्याचा आणखी एक जुना व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ‘ब्यूटी क्वीन’ उर्फ ऐश्वर्याने परदेशी होस्टला ज्याप्रकारे चोख प्रत्युत्तर दिले आहे, ते पाहण्यासारखे आहे.

ऐश्वर्या काही वर्षांपूर्वी डेव्हिड लेटरमॅनच्या शोमध्ये पोहोचली होती, जिथे तिला एक प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी उत्तर देताना ऐश्वर्याने केवळ होस्टचे तोंडच बंद केले नाही, तर संपूर्ण स्टुडिओमध्ये तिच्या उत्तराने टाळ्यांचा गडगडाट सुरू झाला. खरं तर, होस्टने ऐश्वर्याला विचारले होते की, “हे खरे आहे का की, तू तुझ्या पालकांसोबत राहतेस?” यावर ऐश्वर्याने “हो,” असे उत्तर दिले होते. त्यानंतर तो होस्ट पुढे म्हणाला की, “भारतात वाढल्यानंतरही तुमच्या पालकांसोबत राहणे सामान्य आहे का?”

यावर उत्तर देत ऐश्वर्या म्हणाली की, “आमच्या पालकांसोबत राहणे बिल्कुल ठीक आहे. कारण भारतात हे देखील सामान्य आहे की, आम्हाला रात्रीच्या जेवणासाठी आमच्या पालकांना भेटण्याची वेळ घ्यावी लागत नाही.” ऐश्वर्याच्या या उत्तरानंतर तिथे बसलेले सर्व प्रेक्षक जोरात टाळ्या वाजवू लागले. ऐश्वर्याची ही मुलाखत खूप जुनी असली, तरी अजूनही लोकांना ती पाहायला खूप आवडते.

ऐश्वर्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ऐश्वर्या २०१८ ‘‘फन्ने खान’ या चित्रपटामधे दिसली होती. त्यांनतर तिने तीन वर्षामध्ये एकही चित्रपट केला नाही. त्याचबरोबर ऐश्वर्याचा २०२२ मध्ये ‘पोन्नीन सेल्वन’ हा तमिळ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘एकेकाळी टॅक्सीमध्ये बसणे अभिमानाची गोष्ट होती’, अनिल कपूर यांनी ‘त्या’ दिवसांची काढली आठवण

-तब्बल ३० वर्षानंतर अजय देवगणने रिक्रिएट केला त्याचा ‘सिग्नेचर स्टंट’; ट्रकवर केली जबरदस्त ऍक्शन

-‘सलमान, शाहरुख अन् आमिर घाबरतात कारण…’, नसिरुद्दीन शाह यांनी साधला तिन्ही खानांवर निशाणा


Leave A Reply

Your email address will not be published.