Thursday, March 28, 2024

तब्बल ३० वर्षानंतर अजय देवगणने रिक्रिएट केला त्याचा ‘सिग्नेचर स्टंट’; ट्रकवर केली जबरदस्त ऍक्शन

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने आपल्या करिअरची सुरुवात एका ऍक्शन चित्रपटाने केली होती. त्याने ऍक्शन हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला. तो गेल्या दोन दशकांहून अधिक काळ चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे. अजय देवगणने ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटामध्ये त्याने दोन बाईकवर केलेला स्टंट प्रत्येकाला आठवतो. अजयने ‘गोलमाल ३’ आणि ‘सन ऑफ सरदार’ मध्येही त्याचा हा सिग्नेचर स्टंट केला आहे. अजय देवगणने पुन्हा एकदा हा स्टंट रिक्रिएट केला आहे. जो त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही. त्याने आपल्या आगामी प्रकल्पात हा स्टंट केला आहे.

अजय देवगणने त्याचा सोशल मीडिया अकाऊंटवर त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो ‘फूल और कांटे’ मध्ये बाईकवर हा स्टंट करताना दिसला होता. तर आता ३० वर्षांनंतर तो ट्रकवर हा स्टंट करताना दिसत आहे. स्टंटचा हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले की, “मला ३० वर्षांपूर्वी केलेल्या स्‍प्‍लिटची आठवण झाली! एंटरटेनमेंट आणि वैल्‍यूची डबल गॅरंटी! अधिक माहितीसाठी संपर्कात रहा.” (Actor Ajay Devgn will be seen in his upcoming film while doing this stunt)

अजय देवगण लवकरच ‘इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स’च्या एका विशेष भागात दिसणार आहे. डिस्कव्हरीने यासाठी अजय देवगणला साइन केले आहे. हा शो डिस्कवरी प्लस (डिस्कव्हरी+) ऍपवर दाखवण्यात येणार आहे. त्याचबरोबर यासाठी अजय देवगण चार्टर्ड विमानाने मालदीवला रवाना झाला आहे.

अजय दिवगणच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. याशिवाय तो लवकरच संजय लीला भन्साळीं यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’, एसएस राजामौलीचा ‘आरआरआर’ आणि स्पोर्ट्स ड्रामा ‘मैदान’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सलमान, शाहरुख अन् आमिर घाबरतात कारण…’, नसिरुद्दीन शाह यांनी साधला तिन्ही खानांवर निशाणा

-‘शिवगामीदेवी’ची भूमिका साकारून मेगास्टार झाल्या रम्या; बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन्ससाठी सतत असायच्या चर्चेत

-OMG! यामी गौतमच्या चेहऱ्याची ही काय झाली हालत, पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे

हे देखील वाचा