बॉलिवूडचा ‘सिंघम’ म्हणजेच अजय देवगण याने १९९१, साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात त्याची जागा निर्माण केली आहे. आपला पहिला चित्रपट ‘फुल और कांटे’मध्ये त्याने दोन बाईकवर स्टंट करून लोकप्रियता मिळवली होती. अशातच त्याने बॉलिवूडमध्ये ३० वर्षाचा प्रवास पूर्ण केला आहे. त्याच्या पहिल्या चित्रपटापासून ते आजपर्यंत त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार पाहिले आहेत.
आजही अजय देवगणमध्ये काम करण्याची भूक दिसते. सध्या त्याच्याकडे ६ चित्रपट आहेत. हे आगामी काळात प्रदर्शित होणार आहेत. अजयने ऍक्शन, कॉमेडीपासून ते रोमँटिक चित्रपटात देखील काम केले आहे. त्याचा अभिनय सगळ्यांना खूप आवडतो. १९९८ मध्ये ‘जख्म’ आणि २००२ मध्ये ‘द लिजेंड ऑफ भगत सिंग’ साठी नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. (Ajay Devgan clocks ३० years in bollywood said he was not ready for stardom after debut)
बॉलिवूडमध्ये ३० वर्षाचा प्रवास पूर्ण केल्यानंतर अजय देवगणने सांगितले की, तो पुढील ३० वर्षासाठी वॉर्मअप करत आहे. एका दिलेल्या मुलाखतीत त्याने आणखी ३० वर्ष टिकून राहण्याबद्दल सांगितले आहे. बॉलिवूडमध्ये येऊन ३० वर्ष पूर्ण झाल्यावर अजय देवगण म्हणाला की, त्याच्या वडिलांना ( विरू देवगण) यांना अजय अभिनेता बनवा अशी इच्छा होती. त्याने सांगितले होते की, “मला फक्त माझ्या स्वप्नावर लक्ष केंद्रित करायचे होते. मला फक्त तेच करायचे होते जे की ठरवले होते. ‘फुल और कांटे’ हा चित्रपट जेव्हा प्रसिद्ध झाला होता, तेव्हा मी खूप प्रेरित झालो होतो. हे केवळ माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद आणि चाहत्यांचे प्रेम होते.”
अजय देवगणचा आगामी कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ७ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तसेच तो ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘मई डे’, ‘मैदान’, ‘थँक गॉड’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच त्याचा ‘दृश्यम २’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-प्रभास अन् पुजा हेगडेचा ‘राधे श्याम’ रिलीझपूर्वीच लीक! ‘अशी’ काहीशी आहे चित्रपटाची कथा
-दहावीत असताना होती पहिली गर्लफ्रेंड, चित्रपटांप्रमाणेच रंगतदार होती कार्तिक आर्यनची लव्हलाईफ
-अरे वा! अखेर ‘देवमाणूस’चा पुढचा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर प्रोमो व्हायरल










