हिंदी सिनेसृष्टीतील नायक आणि नायिकांच्या प्रेमकथा एखाद्या चित्रपट कथेला लाजवेल अशा असतात. जिथे पहिल्या भेटीतच प्रेमात पडून संसार थाटलेले अनेक कलाकार इंडस्ट्रीमध्ये आहेत. परंतु अभिनेता अजय देवगण आणि काजोल मात्र याला अपवाद आहेत. कारण अजय देवगणने पहिल्याच भेटीत काजोलला नापसंत करत, तिला पुन्हा भेटणे सुद्धा टाळले होते. असा धक्कादायक खुलासा खुद्द अजय देवगणने केला आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेता अजय देवगण आणि काजोल हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘क्यूट कपल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या दोघांनी प्रेमविवाह करून संसार थाटला आहे. दोघांचे ९० च्या दशकातील चित्रपट आजही लोकप्रिय आहेत. त्यासोबतच त्यांच्या चित्रपटांइतकीच त्यांची लवस्टोरीसुद्धा त्यांच्या चाहत्यांमध्ये आवडीचा विषय असतो. अलीकडेच अभिनेता अजय देवगणने त्यांच्या प्रेमकथेबद्दल बोलताना मला काजोल पहिल्या भेटीत अजिबात आवडली नव्हती, त्यामुळे मी नंतर तिला भेटणे टाळले होते. असा मोठा खुलासा त्याने केला.
याबाबत एका मोठ्या वृत्तवाहिनीशी बोलताना अजय देवगण म्हणाला की, “माझी आणि काजोलची पहिली भेट ‘हलचल’ चित्रपटादरम्यान झाली होती. परंतु खर सांगायचे म्हणजे त्यानंतर मला कधीच काजोलला भेटण्याची इच्छा झाली नाही. याच कारण म्हणजे तुम्ही जर काजोलला पहिल्यांदा भेटत असाल तर तिचा मोठा आवाज, अभिमान आणि खुप बोलण्याची सवय या गोष्टी तिचे व्यक्तिमत्व दर्शवतात. मी आणि काजोल एकमेकांपेक्षा खुप वेगळे आहोत. त्यानंतर हळूहळू मला काजोलचा स्वभाव समजू लागला, आणि मला अस वाटते की जे व्हायचं असते ते होतेच.” असेही अजय यावेळी बोलताना म्हणाला.
याबद्दल पुढे बोलताना अजय म्हणाला की, “मी आणि काजोलने कधीच उघडपणे एकमेकांना प्रपोज वगैरे केला नव्हते. दोघांनाही आपल्या नात्याबद्दल घाई करायची नव्हती. यामुळे दोघांपैकी कोणीच कुणाला ‘आय लव यू’ म्हटले नव्हते.”
दरम्यान अजय आणि काजोल दोघेही एकमेकांपेक्षा खूपच वेगळे आहेत. अजय देवगण शांत आणि मितभाषी स्वभावाचा आहे, तर उलट काजोल बिनधास्त आणि प्रचंड बोलकी आहे. इतकेच नव्हेतर तिला खूप बडबड करायला आवडते. पण कौतुकाची बाब म्हणजे भिन्न स्वभाव असूनही दोघेही सुखाचा संसार थाटून आनंदी आयुष्य जगत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘लोकांना असे वाटते की मी…’, म्हणत राखीने शेअर केले तिचे बिकिनीतील बोल्ड फोटो
-ट्विंकल खन्नाने केले ‘वन मॅन आर्मी’ असलेल्या राखी सावंतचे कौतुक, राखीने मानले आभार