बुधवारी (१२ नोव्हेंबर) राष्ट्रीय युवा दिवस साजरा होत आहे. याच दिवसाचे औचित्य साधत बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणने स्वतःसाठीच एक संदेश लिहिला आहे. ज्यामध्ये त्याने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसाबद्दल आठवणी लिहिल्या आहेत. आजच्या घडीला अजय देवगनची गणना सिनेसृष्टीतील यशस्वी अभिनेता म्हणून केली जाते. अभिनयासोबतच तो एक यशस्वी निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही प्रसिद्ध आहे. कामाबद्दल बोलाायच झाल्यास लवकरच तो ‘नवे ३४ ‘ चिञपटात झळकणार आहे, जो स्वतः त्याचा दिग्दर्शकही आहे. चिञपटात त्याच्यासोबत अभिनेते अमिताभ बच्चनही दिसणार आहेत.
अजय देवगण हा हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारापैकी एक आहे. गेल्या ३१ वर्षांपासून तो चिञपट क्षेञात वर्चस्व गाजवत आहे आणि एकापेक्षा एक दर्जेदार चिञपटात काम करत आहे. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्याने आपल्या अभिनयाची चुणूक सर्वांना दाखवत एकापेक्षा एक सरस चिञपटात काम केले होते. परंतु प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात यशस्वी होण्याआधी संघर्ष हा लिहलेला असतोच, अजय देवगनलाही सुरुवातीच्या काळात चिञपटांमध्ये नकाराचा सामना करावा लागला होता. याच काळातील २० वर्षीय अजय देवगणला त्याने राष्ट्रीय युवादिनानिमित्त पञ लिहील आहे, ज्याची सध्या चर्चा होत आहे.
५२ वर्षाच्या अजय देवगणने २० वर्षाच्या तरूण अजय देवगणच्या नावाने पञ लिहिल आहे. या पञामध्ये त्याने नकार स्विकारण्याचा आणि डान्स शिकण्याचा सल्ला युवकांना दिला आहे. त्याने २० वर्षिय अजय देवगणचा उल्लेख करताना नकार आणि अपयशाबद्दल सांगितल आहे, ज्याचा त्यालाही सामना करावा लागला होता. हे पञ सोशल मीडियावर शेअर करत त्याने अत्यंत सुंदर शब्दात युवकांसाठी मोलाचा संदेश दिला आहे.
या प्रेरणादायी पञामध्ये तो लिहितो, ”एक अभिनेता म्हणुन तू या विश्वात आपली ओळख बनवत आहेस. मी प्रामणिकपणे सांगू इच्छितो की, तुला काही कठोर आणि निष्ठुर नकार स्विकारावे लागतील. बुजरा आणि नवखा असतानाही तू काहीही करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करशील. परंतु तू अपयशी होशील. लोक तुला नाव ठेवतील, शंका घेतील, जे सहन करण तुझ्यासाठी सोप नसेल. या सगळ्यामुळे व्यतीथ होऊन तू स्वताःवरच शंका घेशील , यशस्वी होण्यापेक्षा जास्त तू अपयशी होशील. परंतु, शेवटी सगळ्याच फळ गोड असेल. एक दिवस भलेही ऊशिरा का होईना पण, तुला समजेल की आपण आहे तसच राहण आपली किती मोठी ताकद आहे. यासाठी तुला थोड्या ठेचा खाव्या लागतील, पण तू थांबू नकोस. आपल्या निश्चित चाकोरीतुन बाहेर ये, जगाच्या अपेक्षेला स्वतःचा अडथळा बनवू नकोस. कायम प्रामणिक आणि जसा आहे तसाच रहा. डांस करायला शिक, हे दिर्घकाळ तुला मदत करेल.”
अजय देवगणने ‘फूल और कांटे’ चिञपटातुन आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. हा चिञपट १९९१ मध्ये प्रदर्शित झाला होता.स्टंट डायरेक्टर वीरू देवगणचा मुलगा असलेल्या अजय देवगणने पहिल्याच चिञपटात जोरदार एक्शन सिन केले होते. यानंतरच बॉलिवूडमध्ये धुंद डोळे आणि केस ही त्याची खास ओळख बनली. गंभीर स्वभाव, ऊंची आणि देखण्या व्यक्तिमत्वामुळे या नवख्या अभिनेत्याचे अल्पावधीतच असंख्य चाहते बनले.
सुरुवातीला अपयशाचा सामना करावा लागला असला तरी, अजय देवगणने आपल्या कारकिर्दीत त्याने एकापेक्षा एक दर्जेदार चिञपट केले आहेत. सध्या तो चिञपट क्षेञातील आघाडीचा अभिनेता म्हणुन प्रसिद्ध आहे. लवकरच तो ‘आरआऱआऱ’ , ‘मैदान’, ‘सर्कस,’ आणि ‘थैंक गॉड’ या आगामी चिञपटात झळकणार आहे.
हेही वाचा :
- मौनी रॉय दुबईत नाही, तर गोव्यात करणार लग्न? जाणून घ्या बॉयफ्रेंड सूरजसोबत कधी घेणार सात फेरे
- काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेसमध्ये शहनाझ गिलने केला कहर, चाहते म्हणाले ‘सिंहिणी परत…’
- हेमांगी कवी थिरकली लेटस्ट ट्रेंडवर, सोशल मीडियावर व्हिडिओ झाला व्हायरल










