बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgan) आगामी चित्रपट ‘सिंघम अगेन’ खूप चर्चेत आहे. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर आदी कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाबाबत रोज काही ना काही माहिती येत असते. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत नवीन माहिती समोर येत आहे.
‘सिंघम अगेन’मध्ये अनेक मोठे स्टार्स एकत्र दिसणार आहेत. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. चित्रपटाची रिलीज डेट १५ ऑगस्ट २०२४ निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वाढवण्यात आली आहे. अभिनेता अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करून चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची माहिती दिली आहे. अभिनेत्याने सांगितले होते की, चित्रपटाचे शूटिंग अद्याप पूर्ण झाले नाही. आता हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.
अजय देवगणचा ‘औरों में कहां दम था’ हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे, ज्याचा ट्रेलर गेल्या गुरुवारी प्रदर्शित झाला. या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमादरम्यान अजय देवगणला सिंघम अगेनबद्दल बोलण्यास सांगितले गेले. यावर तो म्हणाला, “सिंघम अगेनच्या रिलीजच्या तारखेबद्दल मला खात्री नाही. चित्रपटाचे शूटिंग अद्याप पूर्ण झालेले नाही आणि आम्हाला चित्रपटाचे काही भाग शूट करायचे आहेत.”
चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अजय म्हणाला होता की, टीम घाईघाईत गुणवत्तेशी तडजोड करू इच्छित नाही. अभिनेता म्हणाला, “आम्हाला कोणतीही घाई नाही. जर आम्ही घाईत काही गोष्टी केल्या तर चित्रपटाच्या गुणवत्तेशी तडजोड करावी लागेल. जेव्हा आम्हाला वाटेल की आम्ही चित्रपट प्रदर्शित करण्यास तयार आहोत तेव्हाच आम्ही चित्रपट प्रदर्शित करू.” या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, करीना कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का, ‘पुष्पा 2’ ची रिलीझ डेट झाली प्रलंबित
देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकाऱ्याचा बायोपिक बनणार, किरण बेदीची कथा पडद्यावर उलगडणार