Sunday, June 4, 2023

पोस्टरवर स्टंट दिसतंय, पण चित्रपटात नाही! भडकलेल्या चाहत्याने थेट ठोठावला कोर्टाचा दरवाजा अन् पुढे…

चाहते चित्रपट कलाकारांसाठी संजीवनी बूटीसारखे असतात. चाहत्यांमुळेच सिनेतारकांचे चित्रपट सुपरहिट आणि फ्लॉप ठरतात. आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल चाहत्यांच्या क्रेझचे किस्से बॉलिवूडमध्ये सर्वश्रुत आहेत. पण काही चाहते असेही आहेत की, ज्यामुळे कलाकार अडचणीत येतात. असेच काहीसे हिंदी चित्रपटसृष्टीतील सिंघम अजय देवगणसोबत (Ajay Devgan) घडले आहे. खरं तर, अजमेरमधील एका चाहत्याने २०१९मध्ये अजय देवगणच्या ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटाच्या स्टंट सीन पोस्टरबाबत ग्राहक आयोगात केस दाखल केली होती. मात्र, आता या प्रकरणात अजयला हिरवा कंदील मिळाला आहे.

‘यामुळे’ चाहत्याने केलं ‘असं’
विशेष म्हणजे, अजय देवगणचा चित्रपट ‘दे दे प्यार दे’ आला, तेव्हा या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अजय देवगण स्टंट करताना दिसला होता. खरं तर अजयने १९९१ मध्ये आलेल्या ‘फूल और कांटे’ या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे हा बाइक स्टंट होता. हे पोस्टर पाहून अजमेरचा एक चाहता ‘दे दे प्यार दे’ चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचला. या चित्रपटातील अजय देवगणचा हा स्टंट सीन पाहण्यास न मिळाल्याने, त्याने अजय देवगण आणि या चित्रपटाच्या प्रोडक्शन हाऊस लव्ह फिल्म्स प्रोडक्शनला फोन केला. त्याने चित्रपटावर चुकीची जाहिरात केल्याचा आरोप केला. यासोबतच या व्यक्तीने ४ लाख ५१ हजार रुपयांचे मानसिक नुकसान आणि ११ हजार रुपयांची रक्कम खर्च केल्याप्रकरणी ग्राहक न्यायालयात याचिका दाखल केली होती. (ajay devgn got big relief by court about de de pyaar de film stunt poster case)

अजयला दोन वर्षांनी मिळाला कोर्टातून मोठा दिलासा
या संपूर्ण प्रकरणाची सोमवारी (२३ मे) अजमेरच्या ग्राहक न्यायालयात सुनावणी झाली. ज्या अंतर्गत न्यायालयाने अजय देवगणला निर्दोष घोषित केले. अजयवर दाखल असलेले सर्व खटले निकाली काढण्याचे आदेश देताना, न्यायालयाने अजय देवगण हा केवळ एक कलाकार असल्याचे म्हटले आहे. चित्रपटात सीन न ठेवणं त्याच्या हातात नाही. याशिवाय चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी पोस्टर्स आणि जाहिराती कशा दाखवायच्या आहेत, याच्याशीही त्याचा काहीही संबंध नाही. अशा परिस्थितीत तो या प्रकरणातून पूर्णपणे निर्दोष असल्याचे समोर आले आहे. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा