Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड पुन्हा पडद्यावर रंगणार भयानक हत्येचा थरार, अजय देवगणचा दृश्यम 2 ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

पुन्हा पडद्यावर रंगणार भयानक हत्येचा थरार, अजय देवगणचा दृश्यम 2 ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

अजय देवगणच्या (Ajay Devgn) गाजलेल्या चित्रपटांमध्ये दृश्यम चित्रपटाचे नाव घेतले जाते. 2015 मध्ये आलेला ‘दृश्यम’ हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. एका मर्डर मिस्ट्रीवर बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटाने चांगली कमाई केली. चित्रपटानंतर बराच काळ त्याची कथा लोकांच्या मनात होती. चित्रपटातील अनेक प्रसंग आजही चर्चिले जातात. आता या चित्रपटाबद्दल मोठी बातमी समोर येत असून दृश्यम 2 चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून 2 ऑक्टोबरला घडलेल्या प्रकाराचा विनोद सोशल मीडियावर सातत्याने पाहायला मिळत आहे. आता या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘दृश्यम 2’ या चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली आहे. अभिनेता अजय देवगणने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. ‘दृश्यम 2’ चा टीझरही गुरुवारी रिलीज होणार आहे. याआधी अजय देवगणने त्याच्या सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. पोस्टर पोस्ट करताना अजय देवगणने लिहिले की, ‘आठवतयं ना 2 आणि 3 ऑक्टोबरला काय झाले, विजय साळगावकर पुन्हा आपल्या कुटुंबासह परतत आहेत.’ या चित्रपटाच्या पोस्टरनंतर चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मल्याळम चित्रपट ‘दृश्यम’ चा हिंदी रिमेक 2015 मध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटाला लोकांनी भरभरून प्रेम दिले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला होता. या चित्रपटाच्या कथेने लोकांच्या मनात घर केले होते. चित्रपटाच्या अफाट यशानंतर आता ‘दृश्यम 2’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर गुरुवारी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत श्रिया सरन दिसली होती. आता प्रेक्षक ‘दृश्यम 2’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

अजय देवगणने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याच्या हातात जुनी बिले होती. हा फोटो पोस्ट करत अजय देवगणने लिहिले की, काही जुनी बिले घेतली आहेत. यासोबतच स्वामी चिन्मयानंद यांच्या सत्संगाची सीडीही त्यांच्या हातात दिसत आहे. हा चित्रपट 18 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यासोबतच अजयला या चित्रपटाने पुन्हा बॉक्स ऑफिसवर यशाची आशा निर्माण झाली आहे. ‘दृश्यम 2’ व्यतिरिक्त अजय देवगणचा ‘थँक गॉड’ हा चित्रपटही रिलीजसाठी सज्ज आहे. मात्र, हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यासोबतच अजय देवगण भोला या चित्रपटातही दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- दु:खद! आईच्या निधनाने पूर्ण तुटलाय महेश बाबू, बहीण मंजुलाची पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
फक्त सैफ अली खानचं नाही, बॉलिवूडमधील ‘हे’ कलाकारही आहेत राजघराण्याचे वारसदार
धक्कादायक! ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, 19 वर्षीय मुलाचे निधन

हे देखील वाचा