Wednesday, February 21, 2024

‘भोला’नंतर पुन्हा ‘या’ सिनेमाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर दिसणार अजय आणि तब्बूची सुपरहिट जोडी

अजय देवगण आणि तब्बू ही जोडी 90 च्या दशकापासून प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. दोघं एका क्षेत्रात काम करत असले तरी ते एका कॉलेजमध्येच होते. या दोघांचा आतापर्यंत आलेला प्रत्येक सिनेमा तुफान हिट झाला आहे. आताच्या काही चित्रपटांमध्ये ते मुख्य अभिनेत्री आणि अभिनेता नसले तरी एका सिनेमात विविध भूमिका साकारताना त्यांना पाहिले गेले आहे. या दोघांना एकत्र सिनेमात पाहण्यासाठी ते सतत उत्सुक असतात. नुकतेच या दोघांना ‘दृश्यम 2’ सिनेमात एकत्र पाहिले गेले. या दोघांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी तुफान कौतुक केले. आता लवकरच ही जोडी ‘भोला’ या सिनेमात एकत्र दिसणार आहे. या सिनेमात देखील तब्बू पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

यातच अजून एक बातमी आली की, ‘भोला’ सिनेमानंतर अजय आणि तब्बू अजून एका सिनेमामध्ये एकत्र काम करताना दिसणार आहे. प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार नीरज पांडे यांच्या एका रोमँटिक थ्रिलरमध्ये पुन्हा ही जोडी दिसणार आहे. सध्या या चित्रपटावर जोरदार काम सुरु असून, लवकरच सिनेमाची शूटिंग सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमात तब्बू आणि अजय अतिशय वेगळ्या भूमिकांमध्ये आणि अवतारात दिसणार आहे.

नुकताच अजय देवगनच्या ‘भोला’ सिनेमातील तब्बूचा फर्स्ट लूक समोर आला आहे. तिचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असला तरी अनेकांनी तिला तिच्या या लूकवरून ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तब्बू एकापाठोपाठ एकसारख्याच भूमिका करत असल्याचे ट्रोलर्सचे म्हणणे आहे. दरम्यान अजय देवगनचा ‘भोला’ हा सिनेमा साऊथच्या ‘कैथी’ या सिनेमाचा रिमेक असून, हा सिनेमा साऊथमध्ये सुपरहिट झाला होता. 2019मध्ये आलेल्या या सिनेमात अभिनेता कार्तिकने मुख्य भूमिका साकारली होती. ‘भोला’ या सिनेमाचे दिग्दर्शन खुद्द अजय देवगणच करत आहे. याआधी त्याने ‘यू मी और हम’ आणि ‘शिवाय’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रामलीला सिनेमाच्या सेटवरचे ‘ते’ चित्र पाहत शरद केळकर म्हणाला होता ‘भन्साळी किती पैसे वाया घालवतात यात मी…’

‘मास्टरशेफ इंडिया’ शोला मिळाला अंतिम विजेता ‘या’ स्पर्धकाने ट्रॉफीवर नाव कोरत मिळवले २५ लाखांचे बक्षीस

हे देखील वाचा