अलीकडेच मुंबई पोलिसांनी सांगितले की ते अभिनेता एजाज खानचा शोध घेत आहेत. अलिकडेच एजाज खानविरुद्ध एका अभिनेत्रीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी एजाजशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तेव्हापासून त्याचा नंबर बंद आहे. तो पोलिसांच्या संपर्कात नाही. पोलीस अभिनेता एजाजच्या घरीही पोहोचले पण तो घरी नव्हता.
अभिनेता एजाज खानविरुद्ध रविवारी, ४ मे रोजी शारीरिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने एजाजवर शारीरिक शोषणाचा आरोप केला आहे. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, महिलेने आरोप केला आहे की अभिनेता अजाजने चित्रपट उद्योगात प्रवेश देण्याच्या बहाण्याने तिचे शारीरिक शोषण केले. चारकोप पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका ३० वर्षीय महिलेने अलिकडेच तक्रार दाखल केली होती की, अजाज खानने तिला चित्रपटात भूमिका मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच, तिला धर्मांतर करून लग्न करण्याचे आश्वासन देऊन, त्याने अनेक ठिकाणी तिचे शारीरिक शोषण केले. अधिकाऱ्याने सांगितले की, अभिनेत्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या बलात्काराशी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.
‘हाऊस अरेस्ट’ या रिअॅलिटी शोमधील अश्लील कंटेंटमुळे अभिनेता एजाज आधीच वादात सापडला आहे. शोमधील आक्षेपार्ह टास्क आणि डायलॉग्समुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली, त्यानंतर शो आणि एजाजला खूप ट्रोल केले जात आहे. उल्लू अॅपच्या ‘हाऊस अरेस्ट’ या वेब शोमध्ये अश्लील सामग्री दाखवल्याबद्दल एजाज खानसह अनेक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
मेट गालामध्ये शाहरुख खानने केले राज्य तर दिलजीतने रचला इतिहास, कियारा-प्रियंकासह या सेलिब्रिटींनीही जिंकले मन
फवाद खान-वाणी कपूरच्या ‘अबीर गुलाल’च्या बचावात आले प्रकाश राज, म्हणाले, ‘काही लोक भीती…’