Friday, July 5, 2024

नेता असावा तर असा! मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘सत्यशोधक’ चित्रपटासाठी अजित दादांनी घेतला मोठा निर्णय

सध्या अनेक नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राज्यातील महायुतीने चित्रपटांसाठी तसेच कलाकारांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत अशातच आता सरकारमधील अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.

सगळ्या समाजाला आणि स्त्रियांना शिक्षणाची वाट दाखवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय गाथा असलेल्या चित्रपट पाच जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. हा या चित्रपटाचे नाव सत्यशोधक असे आहे. राज्य सरकारच्या वित्त विभागाने सत्यशोधक चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात जाहीर केला आहे.

नुकतेच सत्यशोधक चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी ज्योतिरावांच्या भूमिकेत असणारे अभिनेते संदीप कुलकर्णी सावित्रीबाईंच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी या चित्रपटातील लुकमध्ये हजेरी दर्शवली होती. सध्या सर्वत्र या चित्रपटाची चर्चा चाललेली आहे. अशावेळी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांना ट्रॅक्स दाखवण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतलेला आहे.

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये सत्यशोधक मराठी चित्रपटात राज्य वस्तू आणि सेवा कर कायद्याअंतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा करायच्या पूर्ती तूर्तास मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजे हा चित्रपट तुम्हाला सिनेमागृहात टॅक्स फ्री बघता येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

शाहिद आणि क्रितीच्या रोमँटिक चित्रपटाचे नाव जाहीर, व्हॅलेंटाईन वीकमध्ये घालणार धुमाकूळ
‘भारतीय सिनेमा जगातील सर्वोत्कृष्ट आहे’; राणी मुखर्जीच्या वक्तव्याने उडाली खळबळ, केले मोठ्या प्रमाणात ट्रोल

हे देखील वाचा