छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस’ ही मालिका आजकाल बरीच चर्चेत असते. मालिकेची कथा, त्यातील रंजक वळणं सर्वकाही प्रेक्षकांना त्यांच्याशी बांधून ठेवत आहे. त्यामुळेच या मालिकेची लोकप्रियता या दिवसात गगनाला भिडली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. याती सर्व पात्रांना चाहत्यांकडून अमाप प्रेम मिळत आहे. या कलाकारांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री अतिशय उत्तम आहे. त्याचप्रमाणे त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री देखील चाहत्यांकडून पसंत केली जात आहे.
या मालिकेत डॉ. अजितकुमार देव हे मुख्य पात्र अभिनेता किरण गायकवाड साकारतोय. नुकताच त्याने मालिकेच्या सेटवरून एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सरू आजी अजितकुमारला मायेने गोंजारताना दिसली आहे. शिवाय यात दोघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
किरण गायकवाडने हा फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. फोटोखाली कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे, “परदे के पीछे की कहानी. ऑफस्क्रीन केमिस्ट्री.” इंटरनेटवर अजितकुमार आणि सरू आजीच्या या फोटोला खूप प्रेम मिळताना दिसत आहे. शिवाय चाहते फोटोखाली कमेंट करून प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. यावरुन असे दिसून येते की, ऑनस्क्रीनप्रमाणे त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही चाहत्यांकडून चांगलीच पसंत केली जात आहे.
मालिकेबद्दल बोलायचं झालं, तर एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते, मात्र त्या व्यक्तीच्या चांगुलपणाच्या मागे राक्षसी चेहरा देखील असू शकतो, याचे दर्शन आपल्याला या मालिकेत घडते. मालिकेतील सरू आजी, डिंपल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या, मंजुळा आणि डॉ. अजित कुमार देव ही पात्रं सध्या रसिकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. विशेष म्हणजे अगदी कमी कालावधीत मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपले खास स्थान निर्माण केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नववारी साडीमध्ये खुललं अपूर्वा नेमळेकरचं सौंदर्य; तर कॅप्शननेही वेधलं अनेकांचं लक्ष
-स्पृहा जोशीचे लाजने पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका; व्हिडिओवर पडतोय लाईक्सचा पाऊस










