नऊवारी साडीमध्ये खुललं अपूर्वा नेमळेकरचं सौंदर्य; तर कॅप्शननेही वेधलं अनेकांचं लक्ष


टीव्हीवर सतत वेगवेगळ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. काहींना प्रेक्षकांची पसंती मिळते, तर काही मालिका प्रेक्षकांना खास प्रभावित करू शकत नाहीत. मात्र झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले. यातील कलाकारांनाही बरीच लोकप्रियता मिळाली. त्यातीलच एक आहे ‘शेवंता’ अर्थातच अपूर्वा नेमळेकर.

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. ती सतत आपले व्हिडिओ आणि फोटो शेअर करून, चाहत्यांचे लक्ष वेधत असते. चाहतेही तिच्या फोटोवर प्रेम व्यक्त करताना दिसतात. नुकतेच तिने तिच्या भावाच्या लग्नाला हजेरी लावली होती. त्यातले तिचे काही फोटो तिने सोशल मीडियावर ही शेअर केले आहेत, जे चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

अपूर्वाने हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. भावाच्या लग्नात अपूर्वाने नववारी घातलेली पाहायला मिळत आहे. पिवळ्या रंगाच्या नववारी साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं आहे. सोबत घातलेले दागिने आणि नाकातील नथ तिच्या सुंदरतेमध्ये आणखी भर घालत आहेत. हे फोटो शेअर करत तिने एक कॅप्शनही लिहिले आहे, जे सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, “भाई की शादी में, हम नववारी में.” अपूर्वाच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळत आहे. चाहत्यांनी कंमेट्सच्या माध्यमातून तिचे कौतुक करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. कमेंट बॉक्समध्ये लाल हार्ट आणि फायर ईमोजीचा पाऊस पाडलेला पाहायला मिळत आहे.

अपूर्वाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘आभास हा’ या मालिकेद्वारे टीव्हीवर पदार्पण केले होते. त्यानंतर अभिनेत्रीने बऱ्याच मालिकेमध्ये भूमिका साकारल्या. मात्र तिला खरी ओळख ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने मिळवून दिली. याशिवाय अपूर्वाने ‘भाकरखाडी ७ किमी’, ‘इश्क वाला लव्ह’, ‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’, आणि ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटातही महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिव्यांका त्रिपाठीला आली होती ‘दया बेन’च्या रोलसाठी ऑफर? खरं काय ते घ्या जाणून

-‘मला जबरदस्तीने प्रेग्नंट करू नका, होईल तेव्हा पेढे वाटेल’, प्रेग्नंसीच्या वृत्तांवर पूनम पांडेने सोडले मौन

-‘किंग खान’च्या लाडकीने केला जिममधील मिरर सेल्फी शेअर; दिसतेय एकदम ‘फिट एँड फाईन!’


Leave A Reply

Your email address will not be published.