Friday, March 14, 2025
Home टेलिव्हिजन ‘मी रोमान्सची वाट पाहत होते…’, मिका सिंगबद्दल पाहा काय म्हणाली आकांक्षा पुरी

‘मी रोमान्सची वाट पाहत होते…’, मिका सिंगबद्दल पाहा काय म्हणाली आकांक्षा पुरी

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगला (Mika Singh) अखेर त्याची ‘वोहटी’ मिळाली. ‘स्वयंवर: मिका दी वोहटी’ यातील सर्व स्पर्धकांना सोडून त्याने आपली सर्वात जुनी मैत्रिण आकांक्षा पुरी (Akansha Puri) हिला आपली जीवनसाथी म्हणून निवडले आहे. अलीकडेच, तिने मिका सिंगसोबत तिच्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि सांगितले की, ती खूप दिवसांपासून रोमान्ससाठी आसुसली होती. मात्र, आता तिला अखेर प्रेम मिळाल्याने ती खूश आहे.

आकांक्षा पुरी म्हणाली, मिका सिंग आणि ती एक पॉवर कपल आहेत आणि ते त्यांच्या प्रेमकथेने संपूर्ण शहर रंगवणार आहेत. आकांक्षा पुरी म्हणाली, “मला कोणालातरी डेट करून खूप दिवस झाले आहेत, मला खूप आनंद झाला आहे की आता माझ्या आयुष्यात एक रोमान्स आहे, ज्याची मी खूप वाट पाहत होते होते. आम्ही खऱ्या अर्थाने पॉवर कपल आहोत. आम्ही आमच्या प्रेमकथेने संपूर्ण शहराला लाल रंग देणार आहोत. (akanksha puri talk about her bond with mika singh)

आकांक्षा पुरी हिने मिका सिंग तिचे कम्फर्टेबल ठिकाण असल्याचे सांगितले आहे. ती म्हणते की, तिला त्या गायकासोबत खूप कम्फर्टेबल वाटतं. आकांक्षा म्हणाली, “माझा त्याच्यासोबतचा प्रवास आतापर्यंतचा सर्वात कम्फर्टेबल होता. तो मला प्रत्येक प्रकारे कम्फर्टेबल वाटतो. तो माझ्यासाठी आनंदी जागा आहे आणि नेहमीच राहील.”

यापूर्वीही आकांक्षा पुरी आणि मिका सिंग यांच्यात डेटिंग असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. अशा परिस्थितीत, आकांक्षाने मिका दी वोहतीची एन्ट्री करणे सर्वांसाठीच आश्चर्यकारक होते. यामुळे आकांक्षा खूप ट्रोलही झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा