मंडळी गेल्या काही दिवसापासून तुम्ही सातत्याने एक गोष्ट ऐकली असेल, ती म्हणजे मिका सिंगचे स्वयंवर. ४५ वर्षीय गायक मिका सिंगने त्याचे स्वयंवर आयोजित केले असून हा एक रिऍलिटी शो असणार आहे. त्यामुळे तो १२ मुलींमधून त्याची जीवनसाथी टीव्हीवरील स्वयंवर- मिका दी वोटी या रिऍलिटी शोमधून निवडणार आहे. तर आता अनेकांना प्रश्न पडला असेल हे स्वयंवर वैगरे एकतर पुस्तकात पाहिलं आहे, नाहीतर पौराणिक मालिका, चित्रपटामध्ये, हे असं आत्ताही कोणी करतं का आणि केलं तरी ते टीव्ही रिऍलिटी शोवर? पण मंडळी असं होतं. मिका सिंग काही पहिला असा सेलिब्रेटी नाही, बरं का की ज्याने एका रिऍलिटी शोच्या माध्यामातून त्याचं स्वयंवर रचलं आहे. यापूर्वीही असे सेलिब्रेटी होऊन गेले, ज्यांनी स्वयंवराचा असाच घाट घातलेला. तर कोण होते ते सेलिब्रेटी, त्यांच्या लग्नाचं काय झालं जाणून घेऊया.
तर या यादीतील पहिलं नाव म्हणजे राखी सावंत. सतत विविध गोष्टींमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री राखी सावंतचं स्वयंवर २००९ मध्ये आयोजित करण्यात आले होते. या स्वंयवरातून तिने इलेश पारुंजवाला याची निवड केली होती. त्याच्याशी तिने साखरपूडाही केला होता. या शोमधून तिला दीड कोटी रुपये मिळाले असल्याचे राखीने सांगितले होते. त्यातूनच तिने मुंबईत एक फ्लॅट खरेदी केला होता. राखीने निवडलेला इलेश हा कॅनडातील बिझनेसमन होता. पण हे दोघेही काही काळाने वेगळे झाले.
राखीनंतर राहुल महाजननेही २०१० साली स्वयंवर आयोजित केले होते. प्रमोद महाजन यांचा मुलगा असलेल्या राहुल महाजनच्या स्वयंवरचे नाव ‘राहुल दुल्हनियां ले जायेगा’ असं होतं. या शोमध्ये राहुलने कोलकाताच्या डिंपी गांगुलीबरोबर लग्न केले होते. पण त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. त्यामुळे दोघांनी घटस्पोट घेतला. या घटस्पोटानंतर डिंपीने बिझनेसमन रोहित रॉयबरोबर लग्न केले.
तर, या यादीत तिसरं नाव येतं ते रतन सिंग राजपूतचे. अगले जनम मोहे बिटीयां ही किजो या मालिकेतून घराघरात पोहतलेल्या रतनचे २०११ साली स्वयंवर आयोजित करण्यात आले होते. ‘रतन का रिश्ता’ या नावाने झालेल्या रिऍलिटी शोमधून रतन तिच्या आयुष्याचा साथीदार शोधणार होती. तिने या स्वंयवरातून अभिनव शर्माला तिचा जीवनसाथी म्हणून निवडले होते. या दोघांनी नॅशनल टीव्हीवर साखरपूडाही केला होता. पण त्यांचं नातं फारकाळ टिकलं नाही आणि त्यांनी एका वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
साल २०१३ मध्ये मल्लिका शेरावतने मेरे खयालों की मलिका हा रिऍलिटी शो आयोजित केला होता, ज्यात तिने विजय सिंगला आपला पार्टनर म्हणून निवडले होते. पण शोनंतर काही काळ ते एकत्र होते. मात्र काही काळाने हे दोघेही वेगळे झाले.
तर, मंडळी आत्तापर्यंत आयोजिक केलेल्या या स्वंयवरातून ज्यांनी आपले पार्टनर निवडले, त्यातील एकाचंही नातं फार काळ टिकलं नाही. आता अनेकांना मिकासिंग बाबतही मागील स्पर्धाकांसारखंच होणार की खरंच त्याला त्याची सपनो की राणी या स्वयंवरातून मिळणार हे पाहावं लागेल.
पाहा संपूर्ण व्हिडिओ: मिका सिंगच नाही, तर या सेलिब्रेटींनीही केलंय स्वयंवर | Mika Singh Swayamvar