Thursday, March 13, 2025
Home मराठी पुण्याच्या आकाश-सुरज या जुळ्या भावांनी जिंकले, ‘मी होणार सुपरस्टार जोडी नं.1’ चे विजेतेपद

पुण्याच्या आकाश-सुरज या जुळ्या भावांनी जिंकले, ‘मी होणार सुपरस्टार जोडी नं.1’ चे विजेतेपद

नुकतेच ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर 1’ या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडलेला आहे. गेल्या दोन महिन्यापासून हा शो चांगल्या उत्साहात सुरू आहे. अखेर या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडलेला आहे. महाअंतिम सोहळ्यात पलक- पूर्वा, आकाश – सूरज, सिद्धेश- रुचिता, अपेक्षा प्रतीक्षा या जोड्या होत्या. परंतु सगळ्यांना मात देत पुण्यातील कोथरूड येथील जुळे भाऊ आकाश आणि सुरज मोरे यांनी विजेतेपदावर त्यांचे नाव कोरलेले आहे. त्याचप्रमाणे सिद्धेश थोरात- रुचिता जामदार आणि अपेक्षा लोंढे प्रतीक्षा लोंढे या दोन जोड्यांना विभागून उपविजेत्याचे पद देण्यात आलेले आहे. महाअंतिम सोहळ्यामध्ये आकाश आणि सुरज मोरे यांनी मानाची ट्रॉफी जिंकली आहे. त्यासोबत त्यांना 5 लाख रुपयांची रक्कम देखील देण्यात आलेली आहे. उपविजेत्या जोडीला 2 लाख रुपये दिलेले आहे. तर तृतीय क्रमांक पटकावलेल्या जोडीला 1 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देखील देण्यात आलेले आहे.

महाविजेतेपदावर नाव कोरल्याने आकाश आणि सुरज यांच्या आनंदाला सीमा राहिली नाही. यावेळी त्यांचा आनंद व्यक्त करताना ते म्हणाले की, “आम्ही आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे. परंतु आज आम्ही ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर 1’ या कार्यक्रमाचे विजेते पद जिंकल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्हाला आमची प्रतिभा सिद्ध करण्यासाठी हक्काचा मंच दिल्याबद्दल खूप खूप आभार. हा सारा प्रवास खूप स्वप्नवत होता. या क्षणाची आम्ही खूप वाट पाहिली आहे. महाअंतिम सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आजपर्यंत आम्ही खूप मेहनत देखील घेतलेली आहे. परंतु या मेहनतीचे फळ आज आम्हाला मिळालेले आहे. या मंचाने अंकुश चौधरी, फुलवा खामकर आणि वैभव घुगे हे गुरुच्या स्वरूपात दिले आहे. या गुरूकडून आम्हाला खूप शिकायला मिळालेले आहे.

आकाश आणि सुरज हे दोघेही सख्खे जुळे भाऊ आहेत. लहानपणापासूनच त्यांना नृत्याची खूप जास्त आवड होती. ते त्यांच्या आईसोबत कोथरूडमध्ये राहतात. घराची परिस्थिती खूप हलाखीची होती. परंतु त्या दोघांमध्येही डान्सची आवड खूप जास्त होती. आणि म्हणूनच त्यांच्या आईने त्यांना डान्सचे प्रशिक्षण दिले. त्यांच्यासमोर अनेक आव्हान होती. परंतु त्या प्रत्येक अडचणीचा सामना करत आकाश आणि सुरज यांनी त्यांच्या नृत्याची आवड जोपासलेली आहे.

त्यांनी आजपर्यंत अनेक छोट्या-मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे. परंतु ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर 1’ हे त्यांच्यासाठी एक खूप मोठे स्वप्न होतं. आणि आज त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालेले आहे. ऑडिशन पासून ते आज विजेता होणापर्यंतचा त्यांचा प्रवास हा खूप थक्क करणारा होता. परंतु त्यांनी त्यांच्या जिद्दीने आणि चिकाटीने हे यश मिळवलेले आहे. आकाश आणि सुरजचे हे यश पाहून त्यांच्या आईचे डोळे देखील पाणवलेले होते. आज या दोन पठ्ठ्यानी पुण्याचे नाव हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवलेले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘डंका… हरीनामाचा’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा कायमचे लंडनला होणार शिफ्ट? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

हे देखील वाचा