Monday, October 27, 2025
Home साऊथ सिनेमा ‘अखंड’चा शानदार ट्रेलर रिलीझ, भारतरत्न पुरस्कारावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नंदामुरींनी जिंकली चाहत्यांची मने

‘अखंड’चा शानदार ट्रेलर रिलीझ, भारतरत्न पुरस्कारावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नंदामुरींनी जिंकली चाहत्यांची मने

अभिनेते नंदामुरी बालकृष्ण सध्या त्यांच्या आगामी ‘अखंड’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नंदापुरी या चित्रपटात अतिशय आव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारताना दिसत असून, नुकताच ‘अखंड’चा नवा ट्रेलर निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे, जो युट्यूबवर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये नंदामुरी अघोराच्या एका दमदार पात्रात दिसत आहे. ट्रेलर पाहता, ‘अंखड’मध्ये नंदामुरी त्यांच्या अप्रतिम अभिनयाची ओळख करून देताना दिसणार आहेत. अवघ्या १६ तासात ८५ लाखांहून अधिक लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे.

ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
द्वारका क्रिएशन्सने १४ नोव्हेंबरला ‘अखंड’ चित्रपटाचा नवीन ट्रेलर प्रदर्शित केला, ज्यावर २० हजार लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि ३ लाखांहून अधिक युजर्सने लाईक केले आहे. हा चित्रपट २ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार असून, यामध्ये प्रेक्षकांना जबरदस्त ऍक्शन सीन्स पाहायला मिळतील. ताज्या व्हिडिओचा सीक्‍वेन्स पाहता ‘अखंड’ पडद्यावर निर्मात्यांसाठी लकी ठरणार आहे, हे लक्षात येते. ट्रेलर पाहून प्रेक्षकांची ‘अखंड’ची उत्सुकता आणखी वाढली आहे. बोयापती श्रीनू दिग्दर्शित या चित्रपटाला थमन एस यांचे संगीत आहे. द्वारका क्रिएशन्स अंतर्गत मिरयाला रविंदर रेड्डी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपटाची मुख्य अभिनेत्री प्रज्ञा जयस्वाल आहे, तर जगपती बाबू आणि श्रीकांत सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत.

ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी नंदामुरी यांच्या खांद्यावर करण्यात आली शस्त्रक्रिया
‘अखंड’चा ट्रेलर प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाचे मुख्य अभिनेते नंदामुरी बालकृष्ण यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती आहे. ते गेल्या अनेक महिन्यांपासून खांद्याच्या दुखण्याने त्रस्त होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, शस्त्रक्रियेनंतर तो आता बरा असून, घरी विश्रांती घेत आहे.

वादग्रस्त विधानांमुळे नंदामुरी राहतात चर्चेत
अभिनयासोबतच नंदामुरी आपल्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत ते एआर रहमानला म्हणाले होते, “एआर रहमान कोण आहे हे मला माहीत नाही. मला काही फरक नाही पडत. दहामधून एकदा, तो एक हिट चित्रपट देतो आणि त्याला ऑस्कर पुरस्कार मिळतो.” एआर रहमानने नंदामुरी बालकृष्णाच्या निप्पू रव्वा (१९९३) साठी संगीत दिले होते.

नंदामुरी यांचे आणखी एक विधान जोरदार व्हायरल झाले ज्यामध्ये त्यांनी म्हटले की, ते भारतरत्नला महत्त्व देत नाहीत. नंदामुरी म्हणाले होते की, “हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांचे दिवंगत वडील एन.टी. रामाराव यांच्यासाठी योग्य नव्हता आणि हे सर्व पुरस्कार माझ्या पायाच्या समान आहेत. तेलुगू सिनेमातील माझ्या कुटुंबाच्या योगदानाची भरपाई कोणताही पुरस्कार करू शकत नाही. मला वाटते की, भारतरत्न हा एनटीआरच्या नखाइतकाच आहे.” त्यांच्या अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सलमान अन् राणीने ‘तेरी चुनरिया’वर केला जबरदस्त डान्स, चाहत्यांच्या आठवणी झाल्या ताज्या

-कंगना रणौतला पुरस्कार, पण तुमच्या नावाचा विचार का नाही झाला? पाहा या प्रश्नावर काय म्हणाला सोनू सूद

-मलायका अन् लहान मुलांची जबरदस्त बॉंडिंग, चिमुकल्याने गाल ओढताच अभिनेत्रीने मारली मिठी

हे देखील वाचा