Thursday, November 21, 2024
Home भोजपूरी जेव्हा विवाहीत पवनसिंगने हॉटेलमध्ये अक्षरा सिंगसोबत केली होती गैरवर्तनूक; मग अभिनेत्रीने…

जेव्हा विवाहीत पवनसिंगने हॉटेलमध्ये अक्षरा सिंगसोबत केली होती गैरवर्तनूक; मग अभिनेत्रीने…

भोजपुरी अभिनेत्री असलेल्या आणि सध्या बिग बॉस ओटीटीच्या घरात कैद असणाऱ्या अभिनेत्री अक्षरा सिंगचा आज वाढदिवस. मुंबईमध्ये जन्मलेल्या अक्षराने मात्र तिचे अभिनयाचे करियर भोजपुरी भाषेत केले. अक्षरा आज भोजपुरीमधील आघाडीची आणि यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने भोजपुरीसोबतच हिंदीमध्येही काम केले आहे. आज (३० ऑगस्ट) अक्षरा तिच्या वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या लव्हलाईफबद्दल अधिक माहिती.

भोजपुरीमध्ये अक्षरा सिंग आणि पवनसिंग ही जोडी सुपरहिट जोडी म्हणून ओळखली जाते. या दोघांची रियल आणि रील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. यांचे काम आणि म्युझिक अल्बम्सला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. हे दोघे खऱ्या आयुष्यात काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही कारणांमुळे त्यांचे नाते पुढे जाऊ शकले नाही. (akshara singh birthday special know her controversary with pavansingh)

अक्षराने एका मुलाखतीमध्ये तिच्या या नात्याबद्दल बरीच माहिती दिली होती. अक्षराला पवनसिंगसोबत लग्न करायचे होते. मात्र एकदिवस अचानक तिला पवनसिंग विवाहित असल्याचे समजले. पवनला तरीही अक्षरासोबत नाते टिकवायचे होते. मात्र अक्षराला तो विवाहित आहे हे समजताच तिने पवनसिंगसोबतचे नाते संपवले.

अक्षराने खरे कारण सांगितल्यावर त्यांच्यात खूप भांडण देखील झाले आणि त्याने अक्षरावर हात देखील उचलला. ते दोघं जेव्हा एका सिनेमाच्या शूटिंगसाठी बाहेर असताना हे सर्व घडले. एका हॉटेलमध्ये ते थांबले असताना पवन दरुषच्या नशेत तिथे पोहचला, आणि त्याने अक्षराला मारहाण देखील केली. हे सर्व हॉटेल कर्मचाऱ्यांसमोर घडले आणि मीडियामध्ये आले.

एवढे सर्व होऊनही अक्षरा शांत होती कारण तिला चित्रपटाच्या शूटिंग याचा कोणताही परिणाम होऊ दयायचा नव्हता. अशातच तिने या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले. पुढे जसा काळ पुढे सर्कल तशी अक्षरा देखील आयुष्यात पुढे गेली. लोकांनी सुद्धा तिला भरभरून प्रेम दिले. मात्र पवनसिंगने तिला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. तिला तिचे करियर खराब करण्याची आणि जीवे मारण्याची देखील धमकी दिली.

पवनला वाटले की, यासर्व गोष्टींमुळे अक्षरा आत्महत्या करेल, मात्र अक्षरा यासर्व गोष्टींशी हिंमतीने लढली. यासर्व प्रतिकूल परिस्थितीत अक्षराला तिच्या पालकांचा संपूर्ण पाठिंबा मिळाला. पवनसिंग विरोधात तिने तक्रार देखील दाखल केली. सध्या अक्षरा बिग बॉसमध्ये असून तिचा खेळ सर्वांनाच आवडत आहे.

 

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा