Friday, July 5, 2024

अक्षरा सिंगच्या ग्लॅमरस अंदाजाने लावली सोशल मीडियावर आग; नेटकरी म्हणाले, ‘भोजपुरी राणी’

अभिनय, गायन आणि नृत्यात आपली प्रतिभा सिद्ध करणारी प्रसिद्ध अक्षरा सिंग ही एक भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. तिने भरपूर भोजपुरी चित्रपट आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. ती ‘बिग बॉस ओटीटी’चा एक हिस्सा देखील होती. याव्यतिरिक्त अक्षरा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. तिचे फोटो शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यामुळे तिची फॅन्स फॉलोविंग वाढत आहे. अशातच तिचे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.

‘भोजपुरी क्वीन’ अभिनेत्री अक्षराने एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. अक्षराने दोन शेड्सच्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एकीकडे टायगर प्रिंट आणि दुसरीकडे प्लेन बॅक असा ड्रेस तिने परिधान केला आहे. यामध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसतेय. तिच्या या अंदाजाने सोशल मीडियावर आग लावली आहे.

अक्षराने फोटो शेअर करून फोटोच्या खाली कॅपशनमध्ये “आपल्या सर्वांना दोन बाजू आहेत…दोन्ही बाजूंना अभिमानाने परिधान करा! कारण आपल्याला बरेच मूड आहेत, फक्त एक का वापरायचे,” असे लिहिले आहे.

तिच्या या फोटोंना आतापर्यंत १ लाखापेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर तिचे चाहते स्वतःला या फोटोवर प्रतिक्रिया देण्यापासून रोखू शकले नाहीत. एका चाहत्याने लिहिले की, “भोजपुरी राणी.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “क्या बात है, सुपर!”

अभिनेत्री अक्षरा सिंगला हाफ आबादी महिला अचीवर्स पुरस्कार २०२०ने सन्मानित करण्यात आले. अक्षरा व्यतिरिक्त, मंदिरा बेदी, रूपल पटेल, पारुल चौधरी यांच्यासह २० लोकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

अक्षरा सिंगने या पुरस्काराबद्दल आपला आनंद व्यक्त केला आणि त्यासाठी आधार आबादी महिला अचीवर्स पुरस्कार आणि निर्माता, दिग्दर्शक दिनेश सिंग यांचेही आभार व्यक्त केले होते. अक्षरा म्हणाली होती की, “हा पुरस्कार मला एक महिला म्हणून अभिमानास्पद वाटत आहे. त्याचबरोबर ते समाजाला एक संदेश देखील देते की मुली खरोखरच कोणापेक्षा कमी नाहीत. हे माझे नशीब आहे की, मला हा पुरस्कार मिळाला आणि त्याहून अधिक आनंद झाला की मला ते माझ्या पटणातील घरी मिळाले. यासाठी मी माझ्या चाहत्यांसह सर्वांची आभारी आहे.”

अक्षराने आतापर्यंत ‘सत्या’, ‘तबादला’, ‘धडकन’, ‘सरकार राज’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवते’, म्हणत सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल बोलली कियारा\

-जॅकलिन फर्नांडिसचे ब्लॅक ब्रालेट, शिमरी जॅकेटमधील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल

-आसामच्या फ्लोरिना गोगोईने पटकावले ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’चे विजेतेपद

हे देखील वाचा