Tuesday, February 18, 2025
Home बॉलीवूड Raksha Bandhan | थीमपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे अक्षयचा ‘रक्षा बंधन’, ट्रेलर आणेल तुमच्या चेहऱ्यावर हास्य

Raksha Bandhan | थीमपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे अक्षयचा ‘रक्षा बंधन’, ट्रेलर आणेल तुमच्या चेहऱ्यावर हास्य

सध्या बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे (Akshay Kumar) सर्व लक्ष त्याच्या आगामी ‘रक्षा बंधन’ या चित्रपटावर आहे, ज्याशी संबंधित प्रत्येक माहिती अभिनेता सोशल मीडियावर शेअर करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे, अक्षयने नुकतेच सांगितले होते. अशा परिस्थितीत, खिलाडी कुमारचे चाहतेही या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते आणि आता चाहत्यांची ही प्रतीक्षाही संपली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘रक्षा बंधन’चा ट्रेलर रिलीझ केला आहे. हा चित्रपट भाऊ आणि बहिणीच्या एका सुंदर नात्यावर आधारित आहे, ज्यामध्ये प्रेमासोबतच खूप धमालही पाहायला मिळणार आहे आणि याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

२ मिनिटे ५५ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार आपल्या चार बहिणींना जीव लावताना आणि त्यांच्या लग्नासाठी व हुंड्यासाठी पैसे जमवताना दिसत आहे. आपल्या बहिणींचे लग्न करून आईला दिलेले वचन पूर्ण करणे, हे अक्षयचे एकमेव स्वप्न आहे. तसेच, भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आणि अक्षय कुमार यांची सुंदर केमिस्ट्रीही ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. ट्रेलरची सुरुवातही या दोघांपासूनच होते. अक्षयचा हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा असून, त्यात भाऊ-बहिणीचे अतूट प्रेम, मैत्री, सर्वकाही दाखवण्यात आले आहे. (akshay kumar and bhumi pednekar film raksha bandhan trailer out)

अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर ही जोडी पुन्हा एकदा ‘रक्षाबंधन’ चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धमाल करायला सज्ज झाली आहे. ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ या चित्रपटात हे दोघे पहिल्यांदा एकत्र दिसले होते आणि त्यानंतर दोघांचीही जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. त्याचबरोबर आता या दोघांची जोडी बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकणार की नाही? हे पाहण्यासारखे असेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा