Monday, October 2, 2023

बॉलिवूडचा सर्वात महागडा अभिनेता असलेल्या अक्षय कुमारची एकूण संपत्ती ऐकली तर होती डोळे पांढरे

अक्षय कुमारने (Akshay kumar) बॉलिवूडमध्ये स्वतःच्या पायावर आणि हिंमतीवर आपले स्थान निर्माण केले. आज हिट सिनेमाची ग्यारंटी असलेल्या अक्षयला कोट्यवधीमध्ये फॅन फॉलोविंग आहे. एका वर्षात अनेक सिनेमे देणारा अक्षय त्याच्या कमालीच्या फिटनेससाठी आणि शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी ओळखला जातो. अक्षयचे सर्वच सिनेमे हिट होत असल्यामुळे अक्षय बॉलिवूडमधला जास्त कमाई करणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. तो एका चित्रपटासाठी देखील बक्कळ रक्कम फि म्हणून घेतो. मागील काही काळापासून अक्षयच्या संपत्तीमध्ये घसघशीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आज या लेखातून जाणून घेऊया अक्षयच्या एकूण संपत्तीबद्दल.

देशात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या मोठ्या हस्तींमध्ये सामील होणारा अक्षय नेहमीच त्याच्या फीवरून चर्चेत असतो. त्याच्या कमाईमुळे नेहमीच तो बॉलिवूडचा सुपरस्टार या यादीत समाविष्ट होतो. फोर्ब्सच्या माहितीनुसार अक्षयकडे एकूण ५०० कोटींची अर्थात ६५ मिलियन डॉलरची संपत्ती आहे. अक्षय त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत मुंबईच्या जुहू परिसरातील एका सी फेसिंग डुप्लेक्समध्ये राहतो. आजच्या काळातील सर्वच सुखसोयींनी युक्त असलेले अक्षयचे हे घर एक पर्यटन स्फोटच बनला आहे. या गहरची किंमत ८० कोटी असल्याचे सांगितले जाते. याशिवाय त्याच्याकडे खार परिसरातील एका भागात आलिशान अपार्टमेंट देखील आहे. याची किंमत ७.८ कोटी असून २०१७ साली अक्षयने हे अपार्टमेंट घेतले.

अक्षयने अंधेरी परिसरात देखील चार फ्लॅट खरेदी केले असून त्याची किंमत १८ कोटींच्या घरात आहे. मुंबईच्या बाहेर देखील अक्षयच्या अनेक अचल संपत्ती आहेत. आलिशान घरासोबतच अक्षयकडे अनेक आलिशान आणि मोठ्या गाड्या आहेत. रिपोर्टनुसार अक्षयकडे एकूण ११ गाड्या आहेत. ज्यात मर्सिडीज बेंज, बेंटले, होंडा सीआरवी. पोर्शे अशा मोठ्या ब्रॅन्डच्या गाड्या आहेत. या गाड्यांची किंमत कोट्यवधी आहेत. अक्षयकडे अनेक मोठ्या बाईक्सचे देखील दमदार कलेक्शन आहे. तो अनेकदा त्याच्या बाइक्स मुंबईच्या रस्त्यांवर चालवताना दिसतो.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आज कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या अक्षय कुमारला कधी काळी काम करुनही मिळत नव्हते पैसे
विराट कोहलीच्या शतकावर अनुष्का शर्मा भावुक; पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘मी नेहमीच तुझ्यासोबत…’
स्वत:च्याच नवऱ्याला लिपलॉक केल्याने ट्रोल झाली होती अभिनेत्री, आता मौन सोडत ट्रोलर्सला चांगलंच झापलं

 

हे देखील वाचा