Sunday, October 1, 2023

23 वर्षांनी येणार ‘धडकन 2’! अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी पुन्हा मोठ्या पडद्यावर करणार रोमान्स?

प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांनी 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या  ‘मैं खिलाड़ी तू अनाड़ी’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती आणि दोघांनाही या चित्रपटातून चांगली प्रसिद्धी मिळाली होती. अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी पुन्हा एकत्र काम करत असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये हिट चित्रपटांच्या सिक्वेलचे वारे वाहत आहे. ‘जवान’ आणि ‘पठान’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांदरम्यान, ‘गदर 2’, ‘ओएमजी 2’ आणि ‘ड्रीम गर्ल 2’ सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. सिक्वेल चित्रपटांचे यश पाहून इतर अनेक चित्रपट निर्मात्यांनी आपापल्या चित्रपटांचे सिक्वेल बनवण्याची तयारी सुरू केली आहे.

‘फुक्रे’, ‘यारियां’ आणि ‘वेलकम’ या चित्रपटांचे सिक्वेल अद्याप बॉक्स ऑफिसवर आलेले नाहीत. दरम्यान, आणखी एका चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची माहिती समोर आली आहे. अक्षय कुमारने यावर्षी ‘OMG 2’ द्वारे लोकांचे मनोरंजन केले. त्याचा आगामी ‘वेलकम 3’ देखील येणार आहे. ब्लॉकबस्टर ड्रामा चित्रपट ‘धडकन’चा (Dhadkan 2) देखील सिक्वेल येणार असल्याचे बोलले जात आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी सांगितले की, ‘धडकन 2’साठी निर्माता रतन जैन यांनी त्यांना संपर्क केला आहे. ते म्हणाले की, “राजा हिंदुस्तानी (1996) या चित्रपटाव्यतिरिक्त जर लोकांनी मला कोणत्याही चित्रपटाबद्दल विचारले तर तो म्हणजे धडकन आहे आणि मी त्याचा सिक्वेल बनवणार आहे.”

बॉलिवूडचे दिग्दर्शक धर्मेश येलंदर नेहमीच त्यांच्या नवीन आणि नाविन्यपूर्ण चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांच्या 2000च्या दशकातील चित्रपटांपैकी एक, “धडकन” हा एक अत्यंत यशस्वी चित्रपट होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर ₹100 कोटींची कमाई केली होती. अगामी चित्रपटात कोणते कलाकार दिसणार हे पाहण महत्वाटचे ठरणार आहे. (Akshay Kumar and Shilpa Shetty will once again romance on the big screen in Dhadkan 2)

अधिक वाचा-
35वर्षीय अभिनेत्री 57वर्षीय शाहरूखवर फिदा; थेट चित्रपटगृहात केला ‘चलेया’ गाण्यावर जबरदस्त डान्स
अंकिता लोखंडेचा डान्स व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले; म्हणले, ‘तुला लाज…’

हे देखील वाचा