Saturday, September 30, 2023

35वर्षीय अभिनेत्री 57वर्षीय शाहरूखवर फिदा; थेट चित्रपटगृहात केला ‘चलेया’ गाण्यावर जबरदस्त डान्स

शाहरुख खान, विजय सेतुपती आणि नयनतारा यांची मुख्य भूमिका असलेल्या जवान या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकेदार सुरुवात केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 100 कोटींहून अधिक कमाई केली असून, हा चित्रपट यावर्षीचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून कलाकारही भारावून गेले आहेत.

या चित्रपटात शाहरुख खान (Shahrukh Khan) दुहेरी भूमिकेत आहे. त्याच्यासोबत विजय सेतुपती आणि नयनतारा देखील महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांकडून त्याला चांगली प्रतिक्रिया मिळत आहे. प्रेक्षक चित्रपटाच्या अॅक्शन, थ्रिलर आणि संगीताचे कौतुक करत आहेत. मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने (hemangi kavi ) देखील जवान पाहिला आहे. तिने चित्रपट पाहून तिचे खूप कौतुक केले आहे. हेमांगी कवीने चित्रपट पाहत असताना थिएटरमध्येच डान्स केल्याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना हेमांगी कवीने ( hemangi kavi ) कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी स्वत:ला रोखू शकले नाही.” मराठी अभिनेत्री हेमांगी कवीनेही नुकताच ‘जवान’ पाहिला आणि तिला चित्रपटाची खूप आवडली. तिने चित्रपटगृहातच चित्रपटाच्या एका गाण्यावर नाचण्याचा मोह आवरत नव्हता. या व्हिडिओमध्ये ती चित्रपटगृहात बसून ‘चलेया’ हे गाणं ऐकत आहे आणि त्यावर ताल धरून नाचत आहे. हेमांगी कवी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

शाहरुख खान स्टारर ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमावला आहे. 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 8 दिवसांत एकूण 386.28 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाची सर्वाधिक कमाई हिंदी व्हर्जनमधून झाली असून या व्हर्जनने 345.88 कोटी, तामिळ व्हर्जनने 23 कोटी आणि तेलुगूने 17.40 कोटींचा व्यवसाय केला आहे. (Famous Marathi actress hemangi kavi danced while war hing shahrukh khan starrer jawan in theatre)

अधिक वाचा-
शशांक केतकरने पत्नीसाठी केली खास पोस्ट; चाहते म्हणाले, ‘खऱ्या आयुष्यातील रमाला…’
‘स्मशानात लागणारी लाकडं मी…’ , नाना पाटेकर यांच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ; एकदा वाचाच

हे देखील वाचा