तंबाखूच्या ब्रँडची जाहिरात केल्याबद्दल, गेले काही दिवस बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला (Akshay Kumar) सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत होते. त्यानंतर त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर माफी मागितली आहे. या पोस्टद्वारे, त्याने त्याच्या चाहत्यांची माफी मागितली आणि म्हणाला की, “मी जाहिरातीतून मिळालेले शुल्क एका चांगल्या कामासाठी दान देईन. जर ब्रँडला हवे असेल, तर ते त्यांच्या कराराचा कायदेशीर कालावधी पूर्ण होईपर्यंत जाहिरात प्रसारित करू शकतात. पण मी भविष्यात जाहिरात हुशारीने निवडण्याचे वचन देतो.”
पुन्हा का ट्रोल झाला अक्षय कुमार?
माफी मागूनही यूजर्स त्याला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. ट्रोलर त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत विचारत आहेत की, “तो जाहिरातीतून मिळालेली फी परत करणार का?” त्याच वेळी, काहीजण त्याला थेट निर्णय घेण्यास सांगत आहेत. एक युजर म्हणाला, “फायदा काय सर? जाहिरात तर चालेलच. ही जाहिरात बंद करून, पैसेही परत केले असते, तर योग्य वाटलं असतं.” (akshay kumar apologies for being tobacco company brand ambassador goes viral)
Fayeda kya sir. Ad to chalega hi. Baat me dum tab hoti jab ye ad band karwa ke paise bhi return kar de.
— chase_π (@chase_xyz) April 21, 2022
तर आणखी एक युजर म्हणतोय की, “तुम्ही करार रद्द का करत नाही आणि ब्रँडला जाहिरातींचे प्रसारण बंद करण्यास का सांगत नाही? डॅमेज सूट चार्ज भरायला एवढं का घाबरतोय? बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपैया?”
Why don't u cancel the contract and ask the brand to stop airing the ads … Why are u afraid to pay the damage suit charges ?
Baap bada na bhaiya, Sabse Bada ₹upaiya ?
— Vinay Kumar Dokania (@VinayDokania) April 20, 2022
एका युजरने लिहिले की, “अक्षय जी, जर तुम्हाला खरोखर वाईट वाटत असेल, तर तुम्ही स्वीकारलेले सर्व समर्थन शुल्क परत करावे आणि कायदेशीररित्या कंपनीला जाहिरात प्रसारित करणे थांबवावे लागेल.. इथे पैशांचा मुद्दा नाही, परंतु जाहिरात थांबवणे महत्त्वाचे आहे.”
अक्षय जी, if u really realise and feeling sorry, then u must return the all the endorsement fee u accepted and legally bind the company to stop airing the add.. here money is not imp, but stopping of the प्रचार of tobacco product is important
Return the fee to vimal & stop ad
— Amit Verma (@iamamitverma7) April 21, 2022
अक्षयच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो अलीकडेच क्रिती सेनन आणि अर्शद वारसीसोबत ‘बच्चन पांडे’ चित्रपटात दिसला होता. त्याचबरोबर आगामी काळात तो ‘मिशन सिंड्रेला’, ‘राम सेतू’, ‘गोरखा’ आणि ‘सेल्फी’, ‘पृथ्वीराज’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










