Friday, April 26, 2024

पान मसाल्याच्या ऍडमुळे अडचणीत सापडला अक्षय कुमार, सेन्सॉर बोर्डाचे माजी प्रमुख निहलानीकडून निषेध व्यक्त

शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि अजय देवगणनंतर (Ajay Devgan), आता पानमसाल्याच्या जाहिरातीत तिसरे नावही पाहायला मिळत आहे. यावेळी अक्षय कुमारने (Akshay Kumar) पान मसाल्याच्या जाहिरातीचे प्रमोशन सुरू केले आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला प्रोत्साहन देणाऱ्या पदार्थाची जाहिरात केल्याबद्दलही या अभिनेत्याला खूप ट्रोल केले जात आहे. अक्षय कुमारच्या या कृत्यानंतर सीबीएफसीचे माजी प्रमुख पहलाज निहलानी यांनीही त्याचा तीव्र निषेध केला आहे. स्वच्छ प्रतिमा असलेला अभिनेता कॅन्सरग्रस्त उत्पादनाचा प्रचार करत असल्याचे, ते म्हणाले.

‘जनतेला गोंधळात टाकलं जातंय’
अक्षय कुमारने टीव्हीवर ‘जुबान केसरी’ बोलल्यानंतर, पहिलाज निहलानी यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “माझा ठाम विश्वास आहे की, जिथे अक्षय कुमार एका सामान्य माणसाला सिगारेट ओढण्याऐवजी सॅनिटरी पॅडवर पैसे खर्च करायला सांगतो, त्याला आतापासून चित्रपटांमधून काढून टाकले पाहिजे. सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा. एकीकडे एक प्रसिद्ध सुपरस्टार जनतेला सिगारेटवर खर्च करू नका असे सांगत आहे. तर दुसरीकडे हाच अभिनेता पान मसाला खाण्याचा सल्लाही देत ​​आहे. हा सर्व प्रकार जनतेसाठी अतिशय गोंधळात टाकणारा आहे.” (former chief of cbfc pahlaj nihalani slams akshay kumar for endorsing pan masala)

बॉलिवूड कलाकारांची दक्षिण भारतीय अभिनेत्यांशी तुलना
पहलाज निहलानी यांनी दक्षिण भारतीय अभिनेत्यांची तुलना बॉलिवूड अभिनेत्यांशी केली. त्यांनी दक्षिण भारतीय अभिनेत्यांचे कौतुक केले की, दक्षिणेत रजनीकांत, विजय आणि खुशबू सारख्या स्टार्सची मंदिरे आहेत. ते म्हणाले, “जेव्हा यशचा ‘KGF 2’ मुंबईत प्रदर्शित झाला तेव्हा चाहत्यांनी त्याच्या कटआउटला दुधाने आंघोळ घातली आणि कर्नाटकातील सुमारे २० हजार पुस्तकांमधून त्याचे मोठे चित्र बनवले. बॉलीवूडच्या कोणत्याही अभिनेत्याचा असा सन्मान झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का?” पुढे ते म्हणाले की, “बॉलिवूड कलाकार कधीही दक्षिणेतील कलाकारांचा दर्जा मिळवू शकत नाहीत.”

‘यांच्या’वरही साधला निशाणा
पहलाज यांना अक्षय कुमारला केवळ निषेधासाठी चित्रपटातून बाहेर करायचे नाही. ते म्हणाले, “अक्षय स्वच्छ प्रतिमेचा अभिनेता आहे, जनता त्याला हिरो म्हणून पाहते. मग तो कर्करोगासारख्या आजाराला प्रोत्साहन देणारे उत्पादन का वापरत आहे.” केवळ अक्षयच नाही, तर गोविंदा आणि पियर्स ब्रॉसननही या गोष्टींना प्रमोट करत असल्याचे त्यांनी सांगितले. दारू आणि पान-मसाला यांची जाहिरात बेकायदेशीर आणि असंवैधानिक असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा

बहुप्रतिक्षित भूलभुलैय्या २ सिनेमाचा टिजर अखेर प्रदर्शित, अक्षय कुमारच्या भूमिकेत छाप पाडतोय ‘हा’ अभिनेता

स्वतःचे सीन स्वतःच करणाऱ्या अक्षय कुमारने थेट ४६ व्या मजल्यावरून मारली होती उडी, तेव्हा…

शाहरुखच्या मन्नतवर सलमान, अक्षय कुमारसह दिग्गज कलाकारांची मांदियाळी ‘हे’ होते विशेष कारण

हे देखील वाचा