Monday, December 9, 2024
Home अन्य ठरलं तर! ‘हे’ बॉलीवूड सेलीब्रेटी करणार आयोध्या वारी, घेणार प्रभू रामचंद्रांचे दर्शन

ठरलं तर! ‘हे’ बॉलीवूड सेलीब्रेटी करणार आयोध्या वारी, घेणार प्रभू रामचंद्रांचे दर्शन

आयोध्येत राम मंंदिराचं(Ram Mandir) उद्घाटन आणि प्रभु श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेला काहीच दिवस उरले आहेत. कार्यक्रमाची तयारी अगदी जोरात सुरू आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील अनेक राजकीय नेते, उद्योगपती आणि योगगुरुंना देखील आमंत्रण दिलं गेलंय. आणि यासोबतच आमंत्रण दिलं गेलंय भारतीय सिनेसृष्टीतील 10 दिग्गज कलाकारांना. 22 जानेवारीला आयोध्येत प्रभु श्रीरामांची प्राणप्रतिष्टा आहे. भारतीय सिनेसृष्टीतील काही कलाकार या कार्यक्रमासाठी खुपच उत्साही दिसत आहेत आणि ते या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चला तर मग भारतीय सिनेसृष्टीतील या 10 दिग्गज कलाकारांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते पाहुयात.

आता योगदान द्यायची आपली बारी :अक्षय कुमार (Akshay Kumar)
बाॅलीवूडचा अभिनेता अक्षय कुमार राम मंंदिराच्या उद्घाटनासाठी खुप उत्सुक आहे. मंंदिराच्या उद्घाटनाला अक्षय कुमार उपस्थिती देखील लावणार आहे. जेव्हा मंदिराच्या निर्मितीचं काम सुरु होतं तेव्हा अक्षयने मंदिरासाठी दान केले होते. आणि सोशल मिडीयावर असंही लिहिलं की, “मी सुरूवात केली आहे. आशा आहे की तुम्हीही यात सहभागी व्हाल. अक्षय कुमारने लोकांना त्यांच्या क्षमतेनुसार योगदान देण्यास आणि मंदिराच्या या ऐतिहासिक निर्मितीमध्ये सहभागी होण्याचा आग्रह केला. ”

हे माझं सौभाग्य आहे: जॅकी श्राॅफ (Jackie Shroff)
अभिनेता जॅकी श्राॅफला देखील राम मंंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मिळालं आहे. जॅकी श्राॅफने निमंत्रण पत्रिकेचा फोटो आपल्या सोशल मिडीयावर पोस्ट करत त्यांनी कॅप्शन लिहीले, “मला 22 जानेवारीला सर्वात पवित्र प्रभु श्रीरामांच्या जन्मभुमीत होणाऱ्या राम मंंदिराच्या उद्घाटनाचा भाग बनण्याचे सौभाग्य मिळाले आहे. भारतीयांच्या आयुष्यात हा ऐतिहासिक दिवस यावा यासाठी दशकांसाठी ज्यांनी योगदान दिले त्यांचा मी आभारी आहे.”

जनसहयोग चालु रहायला हवा: चिरंजीवी(Chiranjeevi)
दक्षिणेचा दिग्गज अभिनेता चिरंजीवीला देखील राम मंंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मिळालं आहे. चिरंजीवी सोबत आपल्या कामची सुरूवात करणारा बालकलाकार तेजा सज्जाचा नवीन चित्रपट हनुमान रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या प्रोमेशन वेळी अभिनेता चिरंजीवीने असा सांगितले की, ” या चित्रपटाच्या प्रत्येक तिकीटातील पाच रुपये राम मंदिराच्या निर्मितीसाठी दान केले जातील. ”

मंदिर पाहण्यासाठी खुप उत्साही आहे: अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan)
हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन ला मंंदिराच्या उद्घाटनात सहभागी होण्यासाठी निमंत्रण मिळालं आहे. त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन देखील प्रभू श्रीरामांच मंदिर पाहण्यासाठी उत्सुक आहे. अभिषेक बच्चन म्हणाले की,” मंदिर कंसं बनलं असेल ? हे पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहे.तिथे जावून प्रभु श्रीरामांच दर्शन घेण्यासाठी देखील मी खुप उत्सुक आहे. ”

या ऐतिहासिक दिवसाची सर्वांनाच आतुरता: अनुपम खेर(Actor Anupam Kher)
अभिनेता अनुपम खेर देखील राम मंंदिराच्या उद्घाटनसोहळ्याला पोहोचणार आहेत. ते म्हणाले,” हिंदुंनी कित्तेक वर्ष सांविधानिक पद्धतीने लढाई लढली आहे. हे केवळ हिंदु धर्माच्या बाबतीत नाही, तर अभिव्यक्तीच्याबाबत आहे. प्रचंड विरोध असूनही श्रीरामांचे मंदिर बनले आहे. आम्ही सर्व भारतीय या ऐतिहासिक दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत.”

या दिवसासाठी मनापासून आतुर: अरूण गोविल(Arun Govil)
निर्माता आणि दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत रामाची भुमिका करणारे अभिनेते अरूण गोविल सुध्दा राम मंंदिराच्या उद्घाटनसोहळ्याला पोहोचणार आहेत. ते म्हणाले , “मी खुप जास्त आनंदी आहे, कित्तेक वर्षांनंतर मला अशी संधी मिळाली आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेकांनी खुप काही गमावलंय. शेवटी मी प्रभु श्रीरामांच दर्शन घेणार आहे. या दिवसासाठी मनापासून आतुरतेने वाट पाहत आहे. ”

माझ्यासाठी खुप भावनात्मक क्षण : दीपिका चिखलिया (Deepika Chikhalia)
रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत शीतेची भुमिका करुण जगभर प्रसिध्दी मिळवणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया देखील राम मंंदिराच्या उद्घाटनसोहळ्याला पोहोचणार आहेत. दीपिका चिखलिया म्हणाल्या, “जेव्हा मला राम मंदिराच्या उद्घाटना सोहळ्याची निमंत्रण पत्रिका मिळाली,तेव्हा माझा आनंद गगनाला मिळाला होता. या ऐतिहासिक दिवसाची मी कित्तेक वर्षांपासुन वाट पाहत आहे. हा माझ्यासाठी खुप भावनात्मक क्षण आहे.”

श्रीरामांचं तेज ग्रहण करण्याची शक्ती द्यावी: मनोज जोशी (Manoj Joshi )
अभिनेता मनोज जोशीही 22 जानेवारीला होणाऱ्या प्रभु श्रीरामांच्या प्राणप्रतिष्टेच्या उत्सवात सहभागी होणार आहेत. ते म्हणाले की, “मला प्रभु श्रीरामांच दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे, याबाबतीत मी स्वःला खुप भाग्यवान समजतो. माझी प्रभु श्रीराम चरणी इतकीच प्रार्थना आहे की, त्यांनी मला सर्व तेज ग्रहण करण्याची शक्ती द्यावी. या दिवसाची मी कित्तेक वर्षांपासुन वाट पाहत आहे. मी खुप खुश आणि खुप भावुक आहे. ”

संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट : मुकेश खन्ना (Mukesh Khanna)
निर्माता आणि दिग्दर्शक बी आर चोपडा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत भीष्म पितामहाची भुमिका निभावणारे अभिनेते मुकेश खन्ना देखील प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्टा सोहळ्यासाठी आयोध्येला येणार आहेत. मुकेश खन्ना म्हणाले, “आयोध्येत राम मंदिराची निर्मीती होणं ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट, सरकार भव्य राम मंदिराची उभारणी करून देशाला एक नवी ओळख दिली आहे. या वास्तूची भव्यता आपण सर्वांनी पहायला हवी.”

प्राणप्रतिष्ठेच्या नंतर दर्शन घेणार : पंकज त्रिपाठी(Pankaj Tripathi)
भारतीय चित्रपटसृष्टीमधील अनेक सुपरस्टार 22 जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनासाठी आयोध्येत(Ayodhya) हजेरी लावणार आहेत. परंतू पंकज त्रिपाठी या भव्य सोहळ्याला उपस्थित राहु शकणार नसल्याचे त्यांनी सांगितल. ते म्हणाले,” भक्त या दिवसाची खुप आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रभू रामांच्या दर्शनासाठी अनेक कलाकारांना आमंत्रित केलं गेलंय. तिथे आजकाल खुप टाइट सिक्युरीटी आहे. खुप भव्य नियोजन केलेलं आहे. मी प्राणप्रतिष्ठेच्या (Prabhu Shri Ram Pranpratishtha) नंतर प्रभू श्रीरामांचं दर्शन घेईल.”

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा