Saturday, April 20, 2024

बॉलिवूडमधील स्पर्धेवर अक्षय कुमार स्पष्टच; म्हणाला, ‘मी नंबर वन होण्याच्या शर्यतीत नाही…’

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडसारख्या इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्ष प्रेक्षकांवर राज्य करणारा लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार सध्या बॉक्सऑफिसवर मागे पडला आहे. 2022 हे वर्ष अभिनेत्यासाठी फारच वाईट ठरलं. या वर्षी अभिनेत्याचे चार चित्रपट प्रदर्शित झाले होते मात्र, एकही बॉक्सऑफिसवर चांगली कामगिरी करु शकला नाही. एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्याला बॉलिवूडमधील शर्यतीबद्दल आपले मत मांडले आहे.

बॉलिवूडमधील खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार (Akshay Kumar) सतत आपल्या धमाकेदार अ‍ॅक्टींग आणि कॉमेडीसाठी ओळखला जातो. 80-90च्या दशकापसून ते आतापर्यत अभिनेता प्रेक्षकांवर राज्य करतोय. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अक्षय चाहत्यांचे मने जिंकण्यास अयशस्वी ठरत आहे. गेल्यावर्षी त्याचे चारही चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. एकेकाळी नंबर 1 अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिले जायचे, याच विषयावर त्याने मत व्यक्त केलं आहे.

अक्षयने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्याला मानधन आणि बॉलिवूडमधील स्पर्धा यावर प्रश्न विचारण्यात आला की, ‘जर गोष्टी जुळून आल्या तर वर्षात 4 चित्रपट करशील का?’ अक्षय म्हणाला, “ही स्टुडीओ संकल्पना आहे. वेगळी संकल्पना आहे.” पुढे प्रश्न विचारला, ‘तु 25 कोटी चित्रपटासाठी मागतोस?’ यावर अभिनेता म्हणाला, “ही ती एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. तुम्हाला त्याहूनही जास्त मिळते.”

पुढे प्रश्न विचारला की, ‘तू नंबर वन होण्याच्या शर्यतीत नाही?’ यावर अभिनेत्याने उत्तर दिले, “नाही, त्यात काही फायदा नाही. असा विचार केला तर ताण येतो.” यानंतर अक्षयला विचारले की, तुझा आवडता दिग्दर्शक? “गुरु दत्त” असं अक्षयने सांगितलं.

वाढत्या अपयशामुळे अक्षयने ‘हेराफेरी’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागासाठी नकार दिला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण झाले आहे. त्याशिवाय अभिनेता ‘गोरखा’ चित्रपटातूनही बाहेर पडला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हे चित्रपट घालणार जानेवारी 2023मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, एकदा पाहाच
भारतातील सामाजिक समस्यांवर आधारित या तीन जबरदस्त डॉक्युमेंटरीज, एकदा पाहाच

हे देखील वाचा