Saturday, June 29, 2024

वाणी कपूरसोबत ‘प्रॅंक’ करायला गेला अक्षय कुमार; मात्र योग्यवेळी अभिनेत्रीने…

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने तर जिंकली आहेतच. त्याचप्रमाणे तो आपल्या छोट्या छोट्या खोडसाळपणाने त्याच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीचा दिवस आनंदी करतो. तो नेहमी त्याच्या व्यस्त वेळेत आनंदी आणि बिनधास्त असतो. अक्षय कुमार अनेकदा त्याच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत मस्ती मजा करत असतो. असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की, अक्षय कुमारला खोड्या करायला आवडते. याचा एक किस्सा कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा’च्या परीक्षक अर्चना पूरन सिंगने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये अक्षयने अभिनेत्री वाणी कपूरला खाली पडण्याचा प्लॅन केला होता पण ती वाचली.

अर्चना पूरन सिंगने ‘द कपिल शर्मा’च्या पहिल्या दिवसाच्या शूटिंगचा एक व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ज्यात अक्षय कुमार ‘बेलबॉटम’च्या कलाकारांसह दिसत आहे. सेटवर अक्षय सोबत कपिल शर्मा, भारती सिंग आणि इतर कलाकार स्टेजवर काही चर्चा करताना दिसतात. त्याच वेळी, प्रेक्षकांची एक झलक व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा एक ‘बिहाइंड द सीन’ व्हिडिओ आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Actress Vani Kapoor performed Akshay Kumar’s Pachka)

या व्हिडिओमध्ये अर्चना आपल्या मोबाईलवरून एक व्हिडिओ बनवत आहे. प्रत्येकजण स्टेजवर अभिनेत्री वाणीची वाट पाहत आहे. जसजशी वाणी येऊ लागते, तसाच अक्षय कुमार टेबलवरून केळीची साल उचलतो आणि प्रवेशद्वाराच्या मध्यभागी ती केळीची साल ठेवतो. जेणेकरून वाणी हाई हिल्स घालून त्यावरून पडेल. इतके करून अक्षय एका बाजूला वाणीला वाचवण्यासाठी उभा आहे. वाणी हळूहळू येते, पण ती केळीची साल जमिनीवर पडलेली पाहून ती वळून पुढे निघून जाते.

हे सर्व पाहून तिला समजते की हे काम कोण करू शकते. ती खूप हसायला लागते आणि अक्षय कुमारकडे इशारा करते. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून अनेक चाहत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

हे देखील वाचा