एकेकाळी ‘खिलाडी कुमार’ या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने या वर्षी जानेवारी महिन्यातच हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत तीन दशके पूर्ण केली. पण, पृथ्वीराज या त्याच्या पुढच्या चित्रपटाचे निर्माते यशराज फिल्म्स आता हा टप्पा पार करण्याचा आनंद साजरा करत आहेत. अक्षयच्या एका चित्रपटात काम करण्याची फी आता 100 कोटींच्या जवळपास असल्याची चर्चा आहे. मात्र सध्या यशाच्या शिखरावर असलेल्या अक्षयने एकेकाळी असेही दिवस पाहिले आहेत जेव्हा त्याला एका निर्मात्याने चित्रपटात काम केल्यानंतर पैसेही दिले नव्हते.
अशातच आज ९ सप्टेंबर रोजी अक्षय कुमार त्याचा वाढदिवस साजरा करत आहे, जाणून घेऊया काही खास गोष्टी….
अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले. पण, एक काळ असा होता की त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत होते. अक्षयने त्याच्या करिअरमध्ये साईन केलेला पहिला चित्रपट ‘दीदार’ होता पण रिलीज झालेला पहिला चित्रपट ‘सौगंध’ होता. यानंतर प्रदर्शित झालेला ‘खिलाडी’ हा चित्रपट इतका हिट झाला की त्याचे नाव ‘खिलाडी कुमार’ ठेवण्यात आले. पण, या इमेजमुळे अक्षयलाही त्याची झळ पोहोचली. त्याला पुन्हा अशाच प्रकारच्या चित्रपटांची ऑफर आली.
‘खिलाडी’ या चित्रपटानंतर अक्षय कुमारने ‘मिस्टर बाँड’, ‘दिल की बाजी’, ‘कायदा कानून’, ‘वक्त हमारा है’, ‘सैनिक’, ‘इलान’, ‘ये दिलगी’ आणि ‘जय किशन’ हे चित्रपट केले. मधल्या काळात त्याचा ‘मोहरा’ हा एक चित्रपट नक्कीच हिट झाला, पण या चित्रपटानंतर अक्षय कुमारचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. यादरम्यान त्याला ‘मैं खिलाडी तू अनारी’, ‘इके पे इक्का’, ‘अमानत’, ‘सुहाग’, ‘घायल दिल’, ‘झालीम’, ‘हम हैं बेमिसाल’, ‘मैदान-ए-जंग’, ‘तू चोर में सिपाही’, ‘खिलाडियों का खिलाडी’, ‘इन्साफ’, ‘मिस्टर अँड मिसेस खिलाडी’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
‘खिलाडी’ हा अक्षय कुमारच्या करिअरमधील हिट चित्रपट होता. या चित्रपटातून त्याला बॉलीवूडमध्ये खिलाडी कुमार हे नावही मिळाले. जेव्हा-जेव्हा त्याचे चित्रपट सतत फ्लॉप व्हायला लागले, तेव्हा खिलाडीच्या नावाने कुठला तरी चित्रपट सुरू व्हायचा आणि त्याच्या करिअरला थोडा धक्का मिळायचा. पण त्यानंतर अक्षय कुमारच्या या इमेजचाही प्रेक्षकांना कंटाळा येऊ लागला. या सगळ्यामुळे अक्षय कुमारच्या यशाला ब्रेक लागला.
त्यानंतर दिग्दर्शक महेश भट्ट यांची नजर त्याच्यावर पडली. त्यांच्या भावाच्या सांगण्यावरून, निर्माता मुकेश भट्ट यांनी अक्षयची भेट घेतली आणि त्याला दोन चित्रपटांची ऑफर दिली. मुकेश भट्ट यांनी अक्षय कुमारची भेट घेऊन दोन चित्रपटांसाठी ६० लाखांची डील केल्याचे सांगितले जाते. अक्षय कुमारची फिल्मी कारकीर्द थक्क करणारी असल्याने त्यानेही फारशी सौदेबाजी केली नाही आणि ६० लाख रुपयांना दोन चित्रपट साइन केले. पण, ३० लाख रुपये मिळवून मुकेश भट्टचा चित्रपट बनवणाऱ्या अक्षयच्या कथेचा खरा ट्विस्ट चित्रपटानंतर आला. विशेष फिल्म्सने 60 लाखांच्या कराराचा शब्द पाळला नाही. ना मुकेश भट्टने त्याच्यासोबत दुसरा चित्रपट केला ना त्याला बाकीचे पैसे मिळाले. अक्षयनेही यावर फार काही केले नाही.
‘संघर्ष’ चित्रपटानंतर त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करायला सुरुवात केली. ‘जंवार’, ‘हेरा फेरी’ आणि ‘धडकन’ यांसारख्या चित्रपटांनंतर अक्षय कुमारची कारकीर्द मजबूत झाली. यानंतर ‘हे बेबी’, ‘भूल भुलैया’, ‘वेलकम’, ‘सिंग इज किंग’, ‘राउडी राठोड’, ‘स्पेशल छबीस’, ‘हॉलिडे’, ‘टॉयलेट – एक प्रेम कथा’ आणि पॅडमॅन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विराट कोहलीच्या शतकावर अनुष्का शर्मा भावुक; पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘मी नेहमीच तुझ्यासोबत…’
नेपाळमध्ये शाल विकून राज कुंद्राने १८ व्या वर्षी केली बिसनेसला सुरुवात, आज आहे करोडोंचा मालक
स्वत:च्याच नवऱ्याला लिपलॉक केल्याने ट्रोल झाली होती अभिनेत्री, आता मौन सोडत ट्रोलर्सला चांगलंच झापलं