Sunday, February 16, 2025
Home बॉलीवूड बापरे! अक्षय कुमार, प्रियांकाचे गाणे झाले तब्बल 17 वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला, 2005 मध्ये झाले होते शुटिंग

बापरे! अक्षय कुमार, प्रियांकाचे गाणे झाले तब्बल 17 वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला, 2005 मध्ये झाले होते शुटिंग

अक्षय कुमार (Akshay Kumar)  आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) यांनी ‘ऐतराज’ आणि ‘मुझसे शादी करोगी’ सारख्या हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. पण ‘वक्त’ नंतर दोन्ही स्टार्सनी पुन्हा एकत्र स्क्रीन शेअर केली नाही. आता या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राचे एक गाणे आले आहे. काय आहे या गाण्याची नेमकी कथा, चला जाणुन घेऊ.

या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे 2005 मध्ये शूट झालेले हे गाणे तब्बल 17 वर्षांनंतर रिलीज झाले आहे. ‘वो पहली बरसात’ असे या गाण्याचे नाव आहे. प्रियांका आणि अक्षयने ‘बरसात’ चित्रपटासाठी हे गाणे शूट केले होते, मात्र नंतर अक्षयने चित्रपट सोडला. यानंतर दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी प्रियांकाला घेऊन बॉबी देओलला मुख्य भूमिकेत घेऊन चित्रपट बनवला.

बॉलीवूड चाहत्यांना ‘बरसात’ चित्रपटाचा टायटल ट्रॅक आठवत असेल, ज्याचे बोल ‘बरसात के दिन आए’ ने सुरू होतात. बॉबी देओल आणि प्रियांका चोप्रा यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे कुमार सानू यांनी गायले आहे, ज्यांना मेलडीचे मास्टर मानले जाते. या गाण्यात मूळ जोडी प्रियांका आणि अक्षय होती. अक्षयने चित्रपट सोडल्यानंतर बॉबी देओल चित्रपटात आला.

गाण्याचे दोन्ही व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की, दोन्ही वेळा गाणे एकाच ठिकाणी आणि सेटिंगमध्ये शूट करण्यात आले आहे. मात्र, अक्षय ज्या व्हिडिओमध्ये आहे, त्यात प्रियांकाने ऑफ व्हाइट कलरचा स्लीव्हलेस शॉर्ट कुर्ती आणि चुरीदार घातला आहे. बॉबी देओलसोबत व्हिडिओमध्ये प्रियांकाचा पोशाख निऑन ग्रीन आहे.

नुकतेच बॉक्स ऑफिसवर वर्ल्डवाइड संवाद साधताना दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी या गाण्याबद्दल आणि चित्रपटाबद्दल चर्चा केली होती. त्याने सांगितले होते की अक्षय आणि प्रियांकाने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती आणि दोघांनी एकत्र शीर्षक ट्रॅक देखील शूट केला होता. पण अक्षयला या दरम्यान त्याच्या काही ‘कौटुंबिक समस्या’ सोडवाव्या लागल्या.

अक्षयसाठी ही अडचण मोठी आहे, अन्यथा तो चित्रपट अशा प्रकारे कधीच सोडणार नसता, असे सुनीलने म्हटले होते. रिपोर्ट्समध्ये असेही सांगण्यात आले आहे की, त्या दिवसांमध्ये अक्षय आणि प्रियांकाच्या जवळीकतेबद्दल अनेक अफवा येऊ लागल्या होत्या, त्यामुळे ट्विंकल खन्नाने अक्षयला चित्रपटात काम न करण्यास सांगितले होते. ‘बरसात’ सोडण्यामागचे खरे कारण काय होते हे फक्त अक्षयच सांगू शकतो. पण ‘वो पहली बरसात’ या गाण्याने चाहत्यांसाठी अक्षय आणि प्रियांकाची जोडी पडद्यावर पाहण्याची उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे.

हेही वाचा – ‘लायगर’चित्रपट प्लॉप ठरल्यामुळे विजय देवरकोंडाने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘चित्रपटाच्या नुकसान भरपाईसह मानधन ही…’
प्रत्येक विकेंडला सोनू सूदच्या घराबाहेर गरजूंच्या रांगा; नेटकरी म्हणाले,’खान मंडळीनी…’
जगासाठी खलनायक लेकीसाठी हिरो! शक्ति कपूर यांच्या वाढदिवशी श्रद्धा कपूरची स्पेशल पोस्ट

हे देखील वाचा