Thursday, July 18, 2024

‘लायगर’ चित्रपट प्लॉप ठरल्यामुळे विजय देवरकोंडाने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘चित्रपटाच्या नुकसान भरपाईसह मानधनही…’

विजय देवरकोंडा (Vijay devarkonda) हा साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे पण पॅन इंडिया चित्रपट ‘लायगर’ त्याच्यासाठी लकी ठरू शकला नाही. हा चित्रपट वाईटरित्या फ्लॉप झाला आणि तो पाहिल्यानंतर लोकांच्या सतत नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनाही मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत आता विजय स्वतः या नुकसानाची भरपाई करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.

25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला ‘लायगर’ हा चित्रपट या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. विजय देवरकोंडा सोबत या चित्रपटात अनन्या पांडे देखील होती, जिने या चित्रपटाद्वारे दक्षिणेत पदार्पण केले. कमी कमाई केल्यानंतर चित्रपटाचे शोही अनेक ठिकाणाहून रद्द होऊ लागले. 100 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट निम्मीही कमाई करू शकला नाही. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने फक्त 40 कोटींची कमाई केली आहे. अशा परिस्थितीत आता अभिनेत्याने मोठे पाऊल उचलले आहे.

‘लायगर’ ने बॉक्स ऑफिसवर जवळपास 15 कोटी रुपयांचे ओपनिंग कलेक्शन करून खाते उघडले आहे. यानंतर चित्रपटाच्या कमाईत सातत्याने घसरण झाल्याने हा चित्रपट मोठा फ्लॉप ठरला. या चित्रपटामुळे निर्माते आणि वितरकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत, समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजय देवरकोंडा यांनी चित्रपटाच्या कमाईपैकी 6 कोटी रुपये निर्मात्यांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘लायगर’ फ्लॉप झाल्यानंतर आता विजय पुढच्या ‘जन गण मन’ या चित्रपटात दिसणार आहे. पुरी जगन्नाथ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. लायगर हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर पुढचा चित्रपटही धोक्यात आला आहे. वृत्तानुसार, विजय देवरकोंडा आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी ‘जन गण मन’ या पुढील चित्रपटासाठी त्यांची फी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा- हॉलिवूड अभिनेता चॅडविक बोसमनला निधनाच्या दोन वर्षानंतर मिळाला पुरस्कार, मार्वल स्टुडिओने केली घोषणा
‘विक्रम वेधा’चे जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; बहुप्रतिक्षित ट्रेलर लाँचची तारीखही घोषित
या 10 अभिनेत्रींनी दाखवून दिले वय म्हणजे फक्त आकडा, आजही गाजवतायेत ओटीटी प्लॅटफॉर्म

हे देखील वाचा