बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (akshay kumar)आगामी चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज‘ (samrat prithviraj) चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. या शुक्रवारी (३ जून) रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचे अक्षय जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान, अक्षयने एका मुलाखतीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना खास आवाहन केले आहे. सम्राट पृथ्वीराज आणि महाराणा प्रताप यांसारख्या भारतीय राजांशी संबंधित कथा इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्याची विनंती अभिनेत्याने केली आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला की इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये भारतीय राजांचा उल्लेख क्वचितच आहे. आक्रमणकर्त्यांबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे. त्यावर लिहिणारे कोणी नाही, असे तो म्हणाला.
अक्षय म्हणाला, “दुर्दैवाने आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आपण सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याबद्दल फक्त दोन-तीन ओळी वाचतो पण आक्रमणकर्त्यांबद्दल बरेच काही नमूद केले आहे. आपल्या संस्कृतीबद्दल आणि महाराजांबद्दल क्वचितच काही लिहिले गेले आहे.” अक्षय म्हणाला की, सम्राटबद्दल जाणून घेण्यासारखे बरेच काही आहे ज्याबद्दल लोकांना अजिबात माहिती नाही.
चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित ‘सम्राट पृथ्वीराज’ वीर आणि पराक्रमी राजा पृथ्वीराज चौहान (prithviraj chauhan) यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट क्रूर आक्रमक मुहम्मद घोरी विरुद्ध महान योद्ध्याच्या लढाईचे वर्णन करतो. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर मानुषी छिल्लर राजकुमारी संयोगिताच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सने केली आहे. चित्रपट भव्य बनवण्यासाठी निर्मात्यांनी या प्रकल्पावर पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-