‘जी चूक पृथ्वीराज चौहानने केली होती, ती बिलकूल करू नका’, कंगनाची ट्विटरवरून मोदींना विनंती

Bollywood Actress Kangana Ranaut Tweeted A Message To Prime Minister Narendra Modi Gave Reference To Prithviraj Chauhan


बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना रणौत ही सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असते. ती नेहमीच ट्विटरमार्फत वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपले रोखठोक मते मांडत असते. अशामध्ये तिने आता पुन्हा एकदा ट्विटरवरून आपले मत मांडले आहे. यावेळी तिने आपली ‘मन की बात’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. तिने ट्विटरवर हल्लाबोल करत मोदींना ट्विटरला माफ न करण्यास म्हटले आहे.

खरं तर कंगनाने ट्वीट करत लिहिले की, “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, जी चूक महान योद्धा पृथ्वीराज चौहान यांनी केली होती, ती चूक बिलकूल करू नका. त्या चुकीचे नाव होते माफी. ट्विटर कितीही माफी मागेल, परंतु तुम्ही माफ करू नका. ते भारतात गृहयुद्ध करण्याचा कट रचत होते.” या ट्वीटसह कंगनाने #BanTwitterInIndia या हॅशटॅगचाही वापर केला आहे.

यापूर्वी कंगनाने ट्विटर सोडून ‘कू ऍप’वर शिफ्ट होण्याबद्दलही बोलले होते.

सोशल मीडिया पोस्टसह कंगना आपल्या आगामी ‘धाकड’ सिनेमाबद्दलही चांगलीच चर्चेत आहे. परंतु आता मध्यप्रदेशमध्ये तिच्या ‘धाकड’ सिनेमाची शूटिंग रोखण्याची धमकी मिळत आहे. संपूर्ण प्रकरण मध्यप्रदेशातील बैतूलचा आहे. तेथील काँग्रेसच्या नेत्याने म्हटले होते की, “कंगनाने शेतकऱ्यांविरुद्ध केलेल्या आपल्या सोशल मीडिया पोस्टसाठी माफी मागितली नाही, तर तिच्या सिनेमाची शूटिंग होऊ देणार नाही.”

दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणात कंगनाने एक बातमी रिट्विट करत म्हटले होते की, “मला नेतागिरी करण्यात कसलाही रस नाही, परंतु असे वाटते की, काँग्रेस मला नेता बणवूनच राहणार आहे.”

कंगना आपल्या ट्वीटमुळे अडचणीत येण्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वीही कंगना वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे चर्चेत राहिली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-


Leave A Reply

Your email address will not be published.