Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडविरुद्ध दक्षिण सिनेमाच्या वादावर अक्षय कुमारचे वक्तव्य म्हणाला, ‘ब्रिटिशांसारखे वागू नका’

बॉलिवूडविरुद्ध दक्षिण सिनेमाच्या वादावर अक्षय कुमारचे वक्तव्य म्हणाला, ‘ब्रिटिशांसारखे वागू नका’

सध्या अक्षय कुमार (akshay kumar)त्याच्या आगामी ‘पृथ्वीराज’ (prithviraj)चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो मानुषी छिल्लरसोबत (manushi chhillar) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त तो एका कार्यक्रमात पोहोचला होता, तेव्हा त्याने बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये सुरू असलेल्या वादावर भाष्य केले.

जेव्हा किच्छा सुदीपने हिंदी भाषेबाबत वादग्रस्त विधान केले तेव्हा अजय देवगणने (ajay devgan) त्याला ट्विटरवर चोख प्रत्युत्तर दिले. तेव्हापासून बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्री एकमेकांशी भांडत आहेत. बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एकमेकांपेक्षा स्वत:ला सरस सिद्ध करण्याची स्पर्धा लागली आहे

सर्व सेलिब्रिटींप्रमाणेच अक्षय कुमारही भाषेच्या वादाकडे लक्ष देत आहे. विशेष म्हणजे अक्षय कुमारने दक्षिणेतील अनेक चित्रपटांच्या रिमेकमध्ये काम केले आहे. दोघेही इंडस्ट्रीला आपला पाठिंबा देत आहेत आणि त्यांच्या भल्यासाठी काहीतरी करत आहेत. जेव्हा ‘आज तक’ने अक्षय कुमारशी चर्चा केली तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ते आपापसात फूट पाडण्याच्या कोणत्याही कृतीवर विश्वास ठेवत नाहीत.

संवादादरम्यान तो म्हणाला की, “देशाचे विभाजन करणे बंद करा. दक्षिण भारत किंवा उत्तर भारत म्हणणे बंद करा. ते काही बोलत असतील तर तुम्ही का काही बोलताय. ते काय बोलतात याच्याशी मला देणेघेणे नाही. मला व्यक्तिश: वाटते की ही भारतीय चित्रपटसृष्टी आहे. त्याच्यासोबत आपले चित्रपटही जावेत, अशी माझी इच्छा आहे.”

तो पुढे म्हणाला, “जसे आज घडत आहे, ते स्वातंत्र्याच्या वेळीही घडले होते. इंग्रजांनीही तेच केले. त्यांनी देशाची दक्षिण भारत, उत्तर भारत, पूर्व भारत अशी विभागणी केली. त्यांच्यासारखे वागू नका. त्यांच्या म्हणण्याने मी प्रभावित झालो नाही. मी फक्त माझे विचार आणि कृती पाहतो.” अशाप्रकारे त्याने त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा