Friday, March 29, 2024

हॉलिवूड अभिनेत्री इवा ग्रीन जॉनी डेपसाठी उतरली मैदानात, सोशल मीडियावर पोस्ट करत केले कौतुक

जॉनी डेप (johnny depp) आणि त्याची घटस्फोटित पत्नी एम्बर हर्ड (Amber Heard) यांच्याविरुद्धचा मानहानीचा खटला सतत चर्चेत असतो. गेल्या १९ दिवसांपासून व्हर्जिनिया कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. नुकतेच जानी आणि अंबर या दोघांचे जबाब आणि साक्ष नोंदवण्यात आली. या सगळ्यात हॉलिवूड अभिनेत्री इवा ग्रीनने तिचा सहकलाकार जॉनीच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. इवा आणि जॉनी यांनी डार्क शॅडोज या चित्रपटात एकत्र काम केले होते. इव्हाने जॉनीसोबतचा एक जुना फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघे एकत्र उभे असल्याचे पाहायला मिळत आहे.काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.

इवा ग्रीनने हा फोटो शेअर करताना जॉनीला पाठिंबा दिला आणि सांगितले की तो खूप दयाळू असल्याचे सांगत त्याची पाठराखण केली आहे. त्याचे सत्य जगासमोर येईल असेही तिने त्याची बाजू मांडताना लिहले आहे. या पोस्टमध्ये इवा म्हणते की, “मला यात काही शंका नाही की जॉनी त्याच्या योग्य नावाने आणि प्रेमळ हृदयाने जगासमोर येईल आणि त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे आयुष्य अधिक चांगले होईल.”

जॉनी डेपच्या समर्थनार्थ इवा ग्रीन सपोर्टने केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. यावर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने “जॉनीला न्याय मिळेल आणि आम्हाला माहित आहे की तो यासाठी योग्य आहे” असे म्हणत आपले मत व्यक्त केले आहे. आणखी एका सोशल मीडिया यूजरने “जॉनीकडे प्रेमळ हृदय आहे.” असे म्हणत त्याचे कौतुक केले आहे तर अनेक चाहत्यांनी जॉनीला पाठिंबा दिल्याबद्दल ईवा ग्रीनचे आभारही मानले आहेत.

जॉनी डेपने त्याची घटस्फोटित पत्नी अंबर हर्ड विरुद्ध $50 दशलक्ष मानहानीचा खटला दाखल केला आहे. हे प्रकरण एका वृत्तपत्रातील लेखाबद्दल आहे जे अंबर आणि जॉनीने लिहिले होते. या लेखाचा त्याच्या कारकिर्दीवर नकारात्मक परिणाम झाला आहे असे तिने याबद्दल म्हणले आहे . तर अंबरने त्या लेखात कोणाचेही नाव घेतले नाही. त्याने आपल्या लेखात कौटुंबिक हिंसाचाराचा बळी असल्याचा दावा केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा