×

दातांच्या मदतीने गिटार वाजवणाऱ्या अक्षय कुमारचा व्हिडिओ झाला व्हायरल, हसूनहसून व्हाल लोटपोट

अक्षय कुमार नेहमीच त्याच्या चित्रपटांमधून, त्याच्या विविध भूमिकांमधून, कार्यक्रमांमधून आपल्याला हसवत असतो. पूर्वी फक्त एक ऍक्शन अभिनेता अशी ओळख असलेल्या अक्षयने आता एक विनोदी अभिनेता अशी ओळख तयार केली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अक्षयने आता त्याच्या पोस्टमधून देखील लोकांना हसवले आहे. जागतिक हास्य दिनाचे औचित्य साधत अक्षयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याचा एक फनी व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षयची करामत पाहून नक्कीच तुम्ही पोट धरून हसाल.

अक्षयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो स्टॅन्ड बाय मी गाणे लावून त्यावर दातांचा वापर करत जिरत वाजवताना दिसत आहे. यामध्ये तो त्याच्या दातांवर कंगवा फिरवत गिटार वाजवत आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून तो स्वतः देखील त्याचे हसू रोखू शकला नाही. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “आनंदाची चाबी. स्वतःवर हसायला शिका. आणि याच गोष्टीवर एक काम आहे जे मी बोर होत असल्यामुळे केले. आशा करतो की माझे काम तुम्हाला नक्कीच हसवेल. कृपया हसा. खरंच हे खूपच त्रासदायक होते.”

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षयचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर त्याचे फॅन्स, नेटकरी कमेंट्स करत त्याचे कौतुक करत आहे. अक्षयबद्दल सांगायचे झाले तर मागील काही काळापासून तो त्याच्या पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर तुफान ट्रोल झाला. वाद वाढताना पाहून त्याला एक स्टेटमेंट काढत सर्वांची माफी देखील मागावी लागली. काही दिवसांपूर्वी त्याचा ‘बच्चन पांडे’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. मात्र तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. आता तो सेल्फी, रामसेतू आदी अनेक चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post