बॉलिवूडचा अॅक्शन स्टार सनी देओल (Sunny Deol) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी तो एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. त्याच्या नवीन चित्रपटाच्या नुकत्याच झालेल्या घोषणेने चाहत्यांमधील उत्साह आणखी वाढवला आहे. या अॅक्शन-पॅक आणि थरारक चित्रपटाचे चित्रीकरण २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू झाले असून, ते सध्या सुरू आहे. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर याबद्दलच्या चर्चांना उधाण आले.
या चित्रपटाद्वारे सनी देओल रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या ‘एक्सेल एंटरटेनमेंट’ या प्रॉडक्शन हाऊससोबत पहिल्यांदाच काम करत आहे. याशिवाय, प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट निजवळच्या सूत्रांनुसार, सनी देओल या चित्रपटात आपल्या जुन्या प्रतिमेतून बाहेर पडणार आहे. तो पडद्यावर यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बालाजी गणेश करत आहेत, ज्यांनी ए.आर. मुरुगादॉस यांच्यासोबत सह-दिग्दर्शक म्हणून बऱ्याच काळापासून काम केले आहे. हा चित्रपट त्यांचा दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट असल्यानेही विशेष मानला जात आहे. कथानकात सस्पेन्स, अॅक्शन आणि भावना यांचा संगम असेल, जो प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे आश्वासन देतो.
हा चित्रपट एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार होत असून, रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि ए.आर. मुरुगादॉस हे संयुक्तपणे निर्माते आहेत. कासिम जगमागिया, विशाल रामचंद्रन, आदित्य जोशी, सुनील जैन आणि युसूफ शेख हे देखील या प्रोजेक्टचे सह-निर्माते आहेत. ‘बॉर्डर २’ च्या यशानंतर, सनी देओलचा हा नवीन प्रोजेक्ट त्याच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठे पाऊल मानले जात आहे. अशा परिस्थितीत, चाहते आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.र्माते ए. आर. मुरुगादॉस हे देखील या प्रोजेक्टशी जोडले गेले आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिका देखील या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे. हा एक हाय-ऑक्टेन अॅक्शन थ्रिलर असून, यात एक अनोखी कथा आणि पात्रे असल्याचे म्हटले जात आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
“तुम्ही पडद्यावर मुख्यमंत्री होऊ शकता, पण खऱ्या आयुष्यात नाही,” प्रकाश राज यांचा थलपथी विजयला टोला










