Saturday, July 6, 2024

अक्षय कुमारसोबत काम करण्यासाठी कपिल शर्मा करणार का त्याची ‘ही’ मोठी अट मान्य?

अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट सर्वत्र धमाल करत आहे. चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कॅटरिना आणि अक्षय कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येणार आहेत. या शोमधील कलाकार आणि बॉलिवूड स्टार मस्ती करताना दिसणार आहेत. दरवेळी अक्षय कुमारकडे चित्रपटात काम मागणाऱ्या कपिल शर्माला या वेळी स्वतः अक्षयने त्याच्या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला आहे. परंतु यासाठी त्याने एक अट ठेवली आहे.

अक्षय कुमार अनेकवेळा कपिल शर्माच्या शोमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येत असतो. ‘बेल बॉटम’नंतर तो ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहचणार आहे. या शोमध्ये ते मजा मस्ती करताना दिसणार आहेत. कपिल आणि अक्षय जेव्हा भेटतात तेव्हा पैशाबद्दल बोलत असतात. या वेळी देखील असेच होणार आहे. परंतु यावेळी अक्षय बाजी मारताना दिसत आहे. (akshay kumar teases kapil sharma says you can do my film but dont take money)

कपिल शर्मा अक्षय कुमारकडे अनेक दिवसापासून चित्रपटात काम मागत आहे. यावेळी ‘द कपिल शर्मा शो’च्या मंचावर अक्षय कपिलला चित्रपटात काम करण्यासाठी विचारणार आहे. परंतु त्यासाठी त्याने एक अट ठेवली आहे. जे ऐकल्यानंतर कपिल शर्माची बोलती बंद झाली. सोनी टीव्हीने या शोमधील एक प्रोमो शेअर केला आहे. जो पाहून समजत आहे की, येणारा एपिसोड खूप मनोरंजक असणार आहे.

या प्रोमोमध्ये अक्षय कुमार म्हणतो की, “मी जेव्हा तुझ्या शोमध्ये येतो तेव्हा पैसे घेतो का?” यावर कपिल शर्मा नाही असे उत्तर देतो. यानंतर अक्षय त्याला म्हणतो की, “जेव्हा तू माझा चित्रपट असाइन करशील तेव्हा पैसे घेऊ नको. कारण जेव्हा मी येतो तेव्हा पैसे घेत नाही मग तू पण नको घेऊ.” हे ऐकून कपिल शर्मा एकदम शांत झाला. मग अक्षय कुमार म्हणाला की, हो आता काहीच नाही बोलणार हा.” हा प्रोमो पाहून समजत आहे की, एपिसोड किती मनोरंजक असणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सूर्यवंशी’च्या प्रदर्शनानंतर नवीन गाणे लॉन्च, पाहायला मिळाली अक्षय कुमार अन् कॅटरिना कैफची दिलखेचक केमिस्ट्री

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी केला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा पार

-पंतप्रधान मोदींशी असलेली जवळीक अक्षय कुमारला पडली महागात, ‘#BoycottSuryawanshi’ सोशल मीडियावर ट्रेंड

हे देखील वाचा