Saturday, January 25, 2025
Home बॉलीवूड ‘सूर्यवंशी’च्या प्रदर्शनानंतर नवीन गाणे लॉन्च, पाहायला मिळाली अक्षय कुमार अन् कॅटरिना कैफची दिलखेचक केमिस्ट्री

‘सूर्यवंशी’च्या प्रदर्शनानंतर नवीन गाणे लॉन्च, पाहायला मिळाली अक्षय कुमार अन् कॅटरिना कैफची दिलखेचक केमिस्ट्री

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार धमाका केला आहे. आता या चित्रपटाचे ‘टिप टिप बरसा पानी’ हे नवीन गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. यात कॅटरिना कैफ आणि अक्षय कुमार ‘मोहरा’ चित्रपटातील सुपरहिट गाण्याचा रिमेक आहे. प्रेक्षकांना कॅटरिना कैफचा गाण्यावरचा डान्स फारसा आवडला नाही आणि ते तिची तुलना रवीना टंडनच्या डान्सशी करत आहेत. तर काहीजण कॅटरिना कैफचे कौतुकही करत आहे.

‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यामध्ये अक्षय आणि कॅटरिनाची धमाकेदार केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. पावसात भिजताना कॅटरिना तिचा आकर्षक लूक दाखवत आहे. अक्षय देखील तिच्या मनमोहक अदावर फिदा झालेला दिसत आहे आणि तिच्यासोबत रोमँटिक डान्स करत आहे. गाण्यात अक्षय काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे, तर कॅटरिना चमकणारी साडी परिधान करून पाण्यात आग लावत आहे.

हे गाणे शेअर करताना अक्षयने लिहिले की, “सूर्यवंशी’चे टिप टिप गाणे लॉन्च झाले आहे.” याचे संगीत विजू शाह यांनी दिले असून, तनिष्क बागचीने ते रिक्रिएट केले आहे. त्याचे बोल आनंद बक्षी आणि तनिष्क बागचीने लिहिले आहेत. ते उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायले आहे. हे गाणे चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या एका दिवसानंतर लॉन्च करण्यात आले आहे. हे गाणे खूप पसंत केले जात आहे.

कॅटरिना अक्षयवर चित्रित झालेल्या पहिल्या दोन गाण्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे असलेले ‘सूर्यवंशी’चे हे चौथे गाणे आहे. यापूर्वी ‘नजा’ आणि ‘मेरे यारा’ ही गाणी लॉन्च करण्यात आले होते. ‘नजा’ गाण्यात कॅटरिना आणि अक्षयचा स्वॅग आणि उत्कृष्ट डान्स मूव्ह्ज आहेत. तर ‘मेरे यारा’मध्ये एक रोमँटिक गाणे आहे, ज्यामध्ये अक्षय-कॅटरिनाचा रोमान्स पाहायला मिळाला. यामध्ये दोघेही क्यूट कपलसारखे दिसत होते.

अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ अभिनित ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात रणवीर सिंग आणि अजय देवगण देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स फ्रँचायझी ‘सिंघम’चा हा तिसरा भाग आहे. दुसरा चित्रपट ‘सिम्बा’ होता, ज्यामध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत होता आणि अजय देवगणचा क्लायमॅक्सचा एक सीन होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी केला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा पार

-अरेरे! प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी लीक झाला ‘सूर्यवंशी’; निर्मात्यांमध्ये काळजीचे वातावरण

-‘सूर्यवंशी’ चित्रपटातील नवीन गाणं रिलीझ, ११ वर्षांनी पाहायला मिळाला कॅटरिना आणि अक्षयचा रोमँटिक अंदाज

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा