Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड अक्षयच्या मदतीला धाऊन आला सिद्धार्थ आनंद ! ॲक्शन चित्रपटातून करणार पुनरागमन ?

अक्षयच्या मदतीला धाऊन आला सिद्धार्थ आनंद ! ॲक्शन चित्रपटातून करणार पुनरागमन ?

हृतिक रोशन आणि शाहरुख खानसोबत काम केल्यानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आता अक्षय कुमार सोबत काम करणार आहे. ही जोडी एका नवीन ॲक्शन चित्रपटासाठी एकत्र काम करणार आहे. मात्र या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुथरिया करणार असून सिद्धार्थ आनंदच्या प्रॉडक्शन हाऊस मार्फ्लिक्स अंतर्गत त्याची निर्मिती केली जात आहे.

अक्षय कुमार आणि सिद्धार्थ आनंद काही दिवसांपासून एका चित्रपटाच्या विचारात होते. आता या दोघांनी लुथरिया दिग्दर्शित ॲक्शन-पॅक एंटरटेनरला ग्रीन सिग्नल दिला आहे.  ‘जेव्हा स्क्रिप्ट लॉक झाली तेव्हा सर्वांना वाटले की अक्षय कुमारच या पात्रासाठी सर्वात योग्य आहे… आणि स्क्रिप्ट ऐकल्यानंतर अक्षयलाही वाटले की हा त्याच्यासाठी योग्य चित्रपट आहे.’

अक्षय कुमार सिद्धार्थ आनंदच्या मार्गदर्शनाखाली एक ॲक्शनचा एक नवीन प्रकार शोधण्यासाठी उत्सुक आहे. आगामी चित्रपटात अक्षय यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. ‘अक्षयला स्पेस ॲक्शन आवडते आणि तो नेहमीच आव्हानांसाठी तयार असतो. मिलन लुथरिया दिग्दर्शित, या चित्रपटात तो कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे.

Marflix येत्या वर्षभरात अनेक चित्रपटांची तयारी करत आहे. यामध्ये शाहरुख खान आणि सुहाना खान अभिनीत सुजॉय घोष दिग्दर्शित ‘किंग’चा समावेश देखील आहे. रॉबी ग्रेवाल दिग्दर्शित सैफ अली खानचा  ‘ज्वेल थीफ’ आणि हृतिक रोशन सोबत सुपरहिरो फ्रेंचाइजी ‘क्रिश 4’.

अक्षय कुमारचा ‘खेल खेल में’ हा चित्रपट १५ ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल झाला. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात अपयशी ठरला आहे. येत्या काही दिवसांत अक्षय ‘जॉली एलएलबी 3’, ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘हाऊसफुल 5’ यांसारख्या बहुप्रतिक्षित चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

गजनी’नंतर आमिर खानने पुन्हा एकदा साऊथच्या दिग्दर्शकाशी हातमिळवणी केली! शाहरुख-सलमानही…

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा