बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार नेहमी कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असतो. हिंदी सिनेसृष्टीचा सुपरस्टार म्हणून अक्षय ओळखला जातो तर ट्विंकल खन्ना एक निर्माती आणि लेखिका म्हणून प्रसिद्ध आहे. या दोघांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा २० वा वाढदिवस साजरा केला. १७ जानेवारी २००१ मध्ये अक्षय आणि ट्विंकलने लग्न केले होते. आज अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांना आरव आणि नितारा अशी दोन मुले आहेत.
अक्षय-ट्विंकलची पहिली भेट फिल्मफेयर मॅगझिनच्या शूटदरम्यान झाली होती. पहिल्या भेटीतच ट्विंकलला पाहताच अक्षय तिच्या प्रेमात पडला होता. त्यानंतर या दोघांची पुन्हा एकदा ‘इंटरनॅशनल खिलाडी’च्या शूटिंगदरम्यान भेट झाली. त्यानंतर मात्र दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. अक्षयने ट्विंकलला प्रपोज केले आणि ते रिलेशनशिपमध्ये आले.
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये, अक्षयने त्यांच्या लग्नाबाबत एक किस्सा सांगितला होता. अक्षयने ट्विंकलला लग्नासाठी प्रपोज केले त्यावेळी ट्विंकलचा ‘मेला’ चित्रपट प्रदर्शित होणार होता. ट्विंकल या चित्रपटासाठी अतिशय उत्साही होती. ट्विंकलने त्यावेळी अशी अट ठेवली की, जर ‘मेला’ हिट झाला तर ती अक्षयशी लग्न करणार नाही आणि चित्रपट फ्लॉप झाला तर ती लग्न करणार पण ‘मेला’ फ्लॉप झाला आणि दोघांचं लग्न झाले.
इंटरनॅशनल खिलाडी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. ट्विंकल खन्नाने अक्षय बद्दल तिची आई डिंपल कपाडिया यांना सांगितले. आईकडून होकार आल्यानंतर त्यांनी १७ जानेवारी २००१ मध्ये लग्न केले.
लग्नाआधी ट्विंकलने अक्षयकडून त्याच्या इतर नातेवाईकांबद्दल विचारले आणि त्यांची मेडिकल हिस्ट्री जाणून घेतली. सोबतच ट्विंकलने अक्षयसोबत लग्न करण्यापूर्वी त्याच्या मेडिकल टेस्ट करवून घेतल्या होत्या. अक्षयच्या सर्व टेस्ट तिने त्याच्या नकळत करून घेतल्या होत्या.
अक्षयला जेव्हा ह्या बद्दल समजले तेव्हा तो आश्चर्यचकीत झाला होता. पण त्यानंतर हे सर्व चांगल्यासाठीच आहे असे म्हणाला. आज अक्षय आणि ट्विंकल बॉलीवूडमधील यशस्वी कपल म्हणून ओळखले जातात. ट्विंकलने लग्नानंतर तिच्या अभिनयाच्या करियरला बाय बाय करत दुसऱ्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.