Tuesday, January 20, 2026
Home बॉलीवूड पत्नी ट्विंकल नाही, तर सासू डिंपलला न्यायचे होते डेटवर; अक्षय कुमारने सांगितले ‘हे’ कारण

पत्नी ट्विंकल नाही, तर सासू डिंपलला न्यायचे होते डेटवर; अक्षय कुमारने सांगितले ‘हे’ कारण

बॉलिवूडमधील ‘खिलाडी’ म्हणजेच अक्षय कुमार हा आज एक टॉप अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या करिअरच्या सुरुवातीला तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत होता. त्याचे नाव बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबत जोडले आहे. तसेच अनेक अभिनेत्रींनी अक्षय कुमारवर फसवल्याचा आरोप केला आहे. त्याने 2001 मध्ये सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी ट्विंकल खन्ना सोबत लग्न केले. अशातच अक्षय कुमारच्या आयुष्यातील एक मोठे सत्य समोर आले आहे. ते म्हणजे त्याला पत्नी ट्विंकल खन्ना नाहीतर त्याची सासू डिंपल कपाडियाला डेटवर न्यायचे होते.

अक्षयने सांगितले कारण
एका मुलाखतीत अक्षय कुमारला विचारले होते की, रात्रीचे कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत तुला रोमँटिक डेटवर जायला आवडेल? यावर त्याने एका क्षणाचाही विचार न करता सांगितले की, “मला डिंपल कपाडियासोबत डेटवर जायला आवडेल.” यांनतर त्याने सांगितले की, “मी त्यांना डेटवर घेऊन जाऊ इच्छितो कारण रात्रभर मी त्यांच्याशी त्यांच्या मुलीबद्दल बोलत बसेल.”

अक्षय कुमार हा सध्या त्याचा चित्रपट ‘पृथ्वीराज’मुळे खूप चर्चेत आहे. राजपूत करणी सेनेला आता या चित्रपटाच्या नावाशी समस्या आहे. करणी सेनेच्या युवा गटाचा अध्यक्ष आणि चित्रपट निर्माता सुरजित सिंग राठोड यांनी सांगितले की, “जर हा चित्रपट महान पृथ्वीराज चौहानवर आधारित आहे, तर या चित्रपटाचे नाव पृथ्वीराज कसे असू शकते. आम्हाला असे वाटत आहे की, चित्रपटाला त्यांचे संपूर्ण नाव द्यावे, त्यांना आदर द्यावा.”

त्यांनी पुढे सांगितले की, या चित्रपटाचे नाव बदलण्या सोबतच त्यांच्या काही अटी आहेत. त्यांनी सांगितले की, हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्यांना या चित्रपटाची स्क्रीनिंग पाहिजे आहे. सुरजित सिंग राठोड यांनी सांगितले की, “जर त्यांनी आमच्या अटी नाही मान्य केल्या, तर त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल. पद्मावत या चित्रपटादरम्यान संजय लीला भन्साळी सोबत काय झाले होते?? आता या चित्रपटाच्या निर्मात्यांना देखील यासाठी तयार राहावे लागेल.”

अक्षय कुमार हा लवकरच सुर्यवंशी या चित्रपटात कॅटरिना कैफसोबत दिसणार आहे. याशिवाय तो ‘बेल बॉटम’, ‘अतरंगी रे’, ‘बच्चन पांडे’, ‘रामसेतू’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा