Saturday, June 29, 2024

‘त्या व्यक्तीने मला स्पर्श…’, अक्षय कुमारने सांगितला त्याचा ‘तो’ अंगावर शहारा आणणारा अनुभव

अनेकदा सामान्य लोकांना काही विचित्र घटनांना सामोरे जावे लागते. बहुतकरून मुलींना अनेकदा विविध प्रकारे होणाऱ्या विनयभंगाला तोंड द्यावे लागते. आपल्याला अनेकदा या घटना पाहून कलाकार नक्कीच अशा घटनांपासून लांब असतात त्यांना असे काही करायला कोणी धजावत नाही असे वाटते. मात्र अशा गोष्टींना घटनांना कलाकार देखील अपवाद नाही. अनेकदा कलाकारांना देखील गर्दीचा फायदा घेऊन चुकीच्या घटनांना सामोरे जावे लागते. अशीच एक घटना घडली होती बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारसोबत.

बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता असलेला अक्षय कुमार आज सुपरस्टार आहे. तो नेहमीच आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर भाष्य करत असतो. मात्र अक्षय जेव्हा लहान होता तेव्हा त्याच्यासोबत एक चुकीचा घटना घडली होती. तो सहा वर्षाचा असताना एका लिफ्टमध्ये लिफ्टमॅनने त्याला चुकीच्या विचाराने स्पर्श केला होता. अक्षयने मानव तस्करी या विषयावर आधारित एका आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये या विषयावर भाष्य केले होते.

akshay kumar
Photo Courtesy: Instagram/akshaykumar

अक्षय कुमारने त्या कार्यक्रमात सांगितले की, “जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझ्या पालकांनी मला सर्व गोष्टी अगदी कोणत्याही प्रकारचा संकोच न ठेवता सांगण्यास सांगितले होते. आमच्यामध्ये तेवढे चांगले नाते होते. मग कोणतेही बाबी मी माझ्या आईवडिलांशी शेअर करू शकत होतो. मी जेव्हा ६ वर्षांचा होतो तेव्हा एका लिफ्टमध्ये का करणाऱ्या व्यक्तीने माझ्यासोबत छेडछाड केली होती. याबद्दल मी माझ्या पालकांना देखील सांगितले. नंतर त्यांनी त्या व्यक्तीची तक्रार पोलिसांना केली. पोलिसांनी त्याला अटक केली होती.”

अक्षयने त्याच्यासोबत झालेल्या या विनयभंगाबद्दल बोलताना सांगितले की, “मी माझ्या शेजारच्या घरी जात होतो तेव्हा त्या व्यक्तीने मला स्पर्श केला. त्याने माझ्या बटला हात लावला मला खूप विचित्र वाटले. मी माझ्या वडिलांना याबद्दल सांगितले. तेव्हा त्यांनी पोलीस तक्रार केली पोलिसांनी केलेल्या तपासात समजले की, तो व्यक्ती हिस्ट्रीशीटर होता. त्याला अटक झाली. मी एक लाजाळू मुलगा होतो. मात्र हे मी माझ्या पालकांना सांगितले.” अक्षय या कार्यक्रमात सांगितले की, सर्व लहान मुलांनी आणि महिलांनी पुढे येऊन बोलणे आवश्यक आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मनपाच्या गलथान कारभारामुळे ज्येष्ठ रंगकर्मींवर झाडू मारण्याची वेळ, अंशुमनने व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप
‘ते कळल्यावर अनेक जणांनी मला अनफॉलो केले’, म्हणणाऱ्या हेमांगी कवीची शाहरुख खानबद्दलची ‘ती’ पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा