Saturday, April 20, 2024

‘ते कळल्यावर अनेक जणांनी मला अनफॉलो केले’, म्हणणाऱ्या हेमांगी कवीची शाहरुख खानबद्दलची ‘ती’ पोस्ट व्हायरल

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचे जगभरात असंख्य चाहते आहेत. त्याची क्रेझ आजही किंचितही कमी झालेली नाही. तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या शाहरुख खानने त्याच्या फॅन्सला अक्षरशः वेड लावले आहे. ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शित होण्याची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत होते, आणि तो दिवस उजाडला, पठाण प्रदर्शित झाला. सिनेमाने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई करत इतिहास घडवला. शाहरुखच्या चाहत्यांनी त्याच्या या सिनेमाला जो प्रतिसाद दिला आहे, तो खरंच भारावून टाकणारा आहे. सध्या सिनेमा आणि शाहरुख याच चर्चा सगळीकडे रंगताना दिसत आहे. सोशल मीडिया तर शाहरुखमय झाले आहे. जिकडे तिकडे फक्त ‘पठाण’ आणि शाहरुख खान याच चर्चा आहेत. मराठी सिनेसृष्टीही त्याचे अनेक चाहते आहेत. यतीचं एक मोठी चाहती म्हणजे अभिनेत्री हेमांगी कवी. हेमांगी कवीने नुकतीच सोशल मीडिया एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने शाहरुखवर होणाऱ्या टिकेबद्दल आणि त्याच टीकेचा तिच्यावर झालेल्या परिणामद्दल तिने भाष्य केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

हेमांगीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “तो कसा दिसतो, त्याचा धर्म काय, कसा बोलतो, अभिनेता म्हणावं का याला वगैरे वगैरे बोलणाऱ्यांनो तुम्ही आता खरंच बंद पडा! अनेक वर्षांपासून ही चर्चा होत आलीए पण आता ती थांबवुया. काय? त्याच्या धर्मामुळे, त्याच्या non conventional Hero looks मुळे त्याचा पराकोटीचा द्वेष करणारे आपण सगळ्यांनीच पाहीले आहेत. मी त्याची fan आहे कळल्यावर अनेक जणांनी मला unfollow केलं. याहून बालिश प्रकार मी पाहीला नाही. असो.
मला वाटतं या द्वेषाचं मुळ कारण हे लोक अनाहुतपणे स्वतःहाला त्याच्याशी compare करत असावेत. हा सगळ्या बाबतीत आपल्यापेक्षा डावा असून ही इतका यशस्वी कसा? आणि आता तर या वयातही!!!
सिनेमा प्रदर्शनासाठी लागणारे सगळे ठोकताळे बाजूला सारून घरबसल्या घरी बसणाऱ्या लोकांना Theatre मध्ये आणणे हे हाच करू जाणे! स्वतःहाच्या मुलाच्या बाबतीत त्याने दाखवलेला संयम (भल्या भल्यांनाही जमला नसता) त्याला या वयात जरा जास्तच आकर्षक बनवतो. उफ्फ अपन तो पहलेसे लुटे हुए थे, अब तो पुरे बरबाद हो गए! पन्नाशी नंतर retirement चे plans करून मोकळे झालेल्यांनो द्वेष करण्यापेक्षा त्याच्याकडून काहीतरी शिकूया! तुमच्या ५७ व्या वर्षी जर तुम्ही २०-२२ वयाच्या मुला-मुलींना नाचवू शकत असाल, वेड लावू शकत असाल तर पुढे बोला! बाकी…झूमे जो पठान मेरी जान, महफ़िल ही लूट जाए!”

हेमांगी कवीने या पोस्टमधून शाहरुख खान आणि त्याच्या पठाण सिनेमावर होणाऱ्या टीकेवर खरपूस शब्दात लिहिले असून, सोबतच तिचे शाहरुख खानवरील प्रेम देखील व्यक्त केले आहे. मात्र कलाकारांनी जरी तिच्या या पोस्टला समर्थन दिले असले तरी, नेटकऱ्यांनी मात्र तिचा या पोस्टवरून चांगलाच समाचार घेतला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कधीकाळी नाना पाटेकरांसोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री आयशा जुल्का, सध्या करते ‘हे’ काम
मधुबाला आधी ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीला ‘अनारकली’ची मिळाली होती ऑफर, जाणून घ्या कोण आहे ‘ती’ अभिनेत्री

 

 

हे देखील वाचा