Monday, July 1, 2024

दिल्लीच्या चांदणी चौकामध्ये जोरात पाळताना दिसला अक्षय कुमार, जाणून घ्या त्याच्या पाळण्याचे कारण

बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘रक्षाबंधन’ चित्रपटाचे चित्रीकरण दिल्लीत करत आहे. या सिनेमात अक्षयसोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. अक्षय कुमारने नुकताच या चित्रपटाच्या शूटिंगचा एक छोटासा व्हिडिओ चाहत्यांसोबत त्याच्या सोशल मिडियावर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय दिल्लीच्या प्रसिद्ध अशा चांदणी चौक भागात पळताना दिसत आहे.

हा व्हिडिओ अक्षयने त्याच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवरून शेअर केला असून, व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘आज चांदणी चौकात रक्षाबंधनच्या सेटवर पळताना अनेक जुन्या आठवणी ताज्या झाल्या. कारण माझे हे जन्मठिकाण आहे. लोकांचे शब्द ऐकणे कधीही जुने नसते’. हा व्हिडिओ सोशल मिडिया भरपूर व्हायरल होत आहे. फॅन्सने अक्षयच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लुकला पसंती दाखवली आहे. सिनेमाच्या नावावरूनच लक्षात येते की, सिनेमा बहीण-भावाच्या नात्यावर आधारित असणार आहे. भावा-बहिणीचे अतूट प्रेम चित्रपटाच्या कथेत दाखवले जाईल. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती अलका हिरानंदानी, कलर यलो प्रोडक्शन्स, झी स्टुडिओज, केप ऑफ गुड फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने करत आहे.

चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले, तेव्हाच अक्षय कुमारने सोशल मीडियावर लिहिले की, ‘माझी बहीण अलका मोठी होत असताना ती माझी चांगली मैत्रीण होती. ही एक मैत्री आहे जी वेगळी आणि गोड आहे.’ आनंद एल राय यांचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट त्याने त्याच्या बहिणीला समर्पित केला होता. आज चित्रपटाच्या शूटिंगचा पहिला दिवस आहे, तुमच्या प्रेमाची आणि प्रार्थनांची गरज आहे.’

काही दिवसांपूर्वीच अक्षयचा ‘बेलबॉटम’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अक्षयसोबत वाणी कपूर, हुमा कुरेशी, लारा दत्ता, आदिल हुसेन आदी कलाकार होते. या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. लॉकडाऊन चित्रपट गुहांमध्ये प्रदर्शित झालेला हा पहिलाच सिनेमा होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…

हे देखील वाचा