कोरोना विषाणूने सारे जग व्यापून टाकले आहे. जिकडे बघावे तिकडे मृत्यूचे तांडव सुरू आहे. देशात सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन लावले आहे. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या राज्यात आणि शहरांमधील रुग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन अभावी लोक तडफडून मरताना दिसत आहे. यातच आता सामान्य लोक, कलाकार मदतीकरता ट्विटरचा वापर मोठ्या संख्येने करत आहेत.
बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी यासाठी ट्विटर अकाउंट्स उघडली आहेत. आलिया भट, अभिषेक बच्चन, सोनू सूद कोरोना पीडितांच्या मदतीसाठी आवाहन ट्वीट करीत आहेत, आणि संबंधित स्त्रोतांविषयी माहिती देत आहेत. जेणेकरून समाजात गरजू लोकांना ही माहिती उपयोगी पडेल.
आता आपल्याकडे ऑक्सिजनचा पुरवठा फार कमी पडत आहे. त्यामुळे लोकांचा जास्त प्रमाणात बळी जात आहे. अशातच आता सुपरस्टार अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने देशात ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेत, ऑक्सिजन केंद्रे दान करण्याचे ठरविले आहे. तिला वितरणासाठी सक्षम आणि नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था यांची आवश्यकता आहे. ट्विंकलने ट्विटरद्वारे लोकांची मदत घेतली आहे.
Please give me leads of a verified, reliable, registered NGO who will help distribute 100 oxygen concentrators
(Supplies upto 4L/min of oxygen) that will be sent directly from the UK to them. ????— Twinkle Khanna (@mrsfunnybones) April 27, 2021
ट्विंकलने लिहिले की, “कृपया मला खरे, विश्वसनीय आणि नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांविषयी माहिती सांगा, जी १०० ऑक्सिजन एकत्रीकरण केंद्रे वितरित करण्यास मदत करू शकते.” ट्विंकलने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “हे सर्व त्यांच्याकडे थेट यूकेमधून पाठवले जातील.”
एका युजरला उत्तर देताना ट्विंकल म्हणाली की, “मी ट्विटरचा उपयोग फक्त काही काळासाठी महत्त्वाचे मुद्दे जाहीर करण्यासाठी म्हणून करत होते, परंतु या वाईट काळात मदत म्हणून मी परत आले आहे.”
यापूर्वी अक्षय कुमारने गौतम गंभीर फाउंडेशनला कोरोना पीडितांसाठी अन्न, औषधे आणि ऑक्सिजनची व्यवस्था करण्यासाठी एक कोटी रुपयांची मदत केली होती.
Every help in this gloom comes as a ray of hope. Thanks a lot @akshaykumar for committing Rs 1 crore to #GGF for food, meds and oxygen for the needy! God bless ???????? #InThisTogether @ggf_india
— Gautam Gambhir (@GautamGambhir) April 24, 2021
ट्विटरद्वारे माहिती देताना गौतम गंभीर यांनी अक्षय कुमारचे आभार मानले होते. यावेळची कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने कशी मदत करता येईल, याचा विचार करत तशी पावले उचलत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-