गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अक्षय कुमार (akshay kumar) आणि आनंद एल. राय. यांनी आगामी ‘गोरखा’ चित्रपटाची घोषणा केली होती. दोघे एकत्र आलेले अक्षय कुमार आणि आनंद एल राय यांचा हा तिसरा चित्रपट असेल. संजय पूरण सिंग दिग्दर्शित हा चित्रपट भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटचे एक महान अधिकारी मेजर जनरल इयान कार्डोझो यांच्या जीवनावर आधारित आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे प्रदर्शन रखडल्याचे वृत्त आले होते. ताज्या अपडेटनुसार, आनंद एल राय यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितले की, चित्रपट बंद झालेला नाही, परंतु त्याची स्क्रिप्ट परिपूर्ण करण्यासाठी काम सुरू आहे.
आनंद एल राय ‘गोरखा’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत नसून निर्मिती करत आहेत. माध्यमांशी बोलताना आनंद एल राय म्हणाले, “चित्रपट पूर्णपणे भावनांवर आधारित आहे. आम्ही ‘गोरखा’ वर काम करत आहोत आणि जोपर्यंत चित्रपट फ्लोरवर जाण्यासाठी योग्य वेळ येत नाही तोपर्यंत ते करत राहू. रक्षाबंधन खूप लवकर प्रदर्शित झाला आहे पण काही चित्रपट असे असतात ज्यांना वेळ लागतो. आम्हाला ज्या पद्धतीने चित्रपट बनवायचा आहे त्यानुसार वेळ लागेल.” आनंद पुढे म्हणाले की, “आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे योग्य स्क्रिप्ट शोधत आहोत आणि त्यावर काम सुरू आहे. आम्ही सर्व चित्रपटांसाठी ही प्रक्रिया फॉलो करतो.”
आनंद एल रायने यापूर्वी अक्षय कुमारसोबत ‘अतरंगी रे’ चित्रपटात काम केले होते, ज्यामध्ये धनुषसोबत सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. अशा परिस्थितीत आता दोघेही ११ ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होणाऱ्या ‘रक्षा बंधन’ या नवीन चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नेसली माहेरची साडी…’ खास गाण लावून अलका कुबल यांचा लंडनमध्ये सेंडऑफ, पाहा काय आहे प्रकरण
ज्युनिअर एनटीआरवर कोसळला दुखाःचा डोंगर, कुटूंबातील व्यक्तीने केली आत्महत्या










